Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यास गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना राबविण्याचे नियोजन आहे. वेळेत दुरुस्तीची कामे पूर्ण करणे, पर्यायी पाणीस्स्रोत उपलब्ध करणे आणि गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, या उपायांवर भर दिला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 25, 2026 | 01:29 PM
हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट

हिंगोलीत हिवाळ्यातच पाणीटंचाईची चाहूल; भूजल पातळीत 2.23 मीटरने झाली घट

Follow Us
Follow Us:
  • दुरुस्तीपासून टँकरपर्यंत विविध उपाययोजना
  • पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन
  • पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे
हिंगोली : पावसाळा संपताच जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भूजल पातळीत सप्टेंबर महिन्यातच २.२३ मीटरने घट झाल्याने आगामी काळात ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली असून, विविध उपाययोजनांसाठी ९ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे.

पावसाळा संपल्यानंतर लगेचच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. विहिरी आणि विंधन विहिरींची पाणीपातळी खालावत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऑक्टोबर महिन्यातच टंचाईची चाहूल लागल्याने आगामी उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

दुरुस्तीपासून टँकरपर्यंत विविध उपाययोजना

टंचाईग्रस्त गावांमध्ये परिस्थितीनुसार विविध कामे केली जाणार आहेत. बंद किंवा बिघाड झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, पूरक पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, नवीन विंधन विहिरी घेणे, अस्तित्वातील विहिरींचे खोलीकरण आणि खासगी विहिरींचे अधिग्रहण यांचा आराखड्यात समावेश आहे. ज्या गावांमध्ये अन्य पर्यायांद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही, तेथे टँकरचा पर्याय वापरण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसेमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; शशिकांत कांबळे यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन

उपलब्ध प्रकल्प आणि तलावांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यासह पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांमध्ये बिघाड आहे किंवा पर्यायी पाणीस्रोतांची गरज आहे, अशा ठिकाणी आवश्यक कामे हाती घेण्याची तयारी करण्यात आली आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्यास गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना राबविण्याचे नियोजन आहे. वेळेत दुरुस्तीची कामे पूर्ण करणे, पर्यायी पाणीस्स्रोत उपलब्ध करणे आणि गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, या उपायांवर भर दिला जाणार आहे.

FAQ

हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट का निर्माण होत आहे?
– पावसाळा संपल्यानंतर भूजल पातळीत घट होत असल्याने आगामी काळात ग्रामीण भागात पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे.

सप्टेंबर महिन्यात भूजल पातळीत किती घट झाली?
– सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीत २.२३ मीटरने घट झाली आहे.

पाणीटंचाईचा सर्वाधिक परिणाम कुठे होण्याची शक्यता आहे?
– ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर पाणीटंचाईचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Hingoli faces water shortage even in winter nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Water Issue

संबंधित बातम्या

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
1

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद
2

ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट; शहराचा पाणी पुरवठा 36 तास पूर्णपणे राहणार बंद

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
3

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा
4

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.