Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी देतानाच सभापतींनी महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागाने खर्चात बचत कशी करता येईल, याचा अहवाल पुढील १० दिवसांत स्थायी समितीकडे सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2026 | 05:10 PM
अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Follow Us
Follow Us:
  • अनावश्यक खर्चाला कात्री लावा
  • 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या
  • अभिषेक बारणे यांचे कडक निर्देश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी ठोस पावले उचलावीत. जनतेच्या पैशांची बचत करत शहराच्या विकासकामांना गती द्यावी, असे कडक निर्देश स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला दिले. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी देतानाच सभापतींनी महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

 

महापालिकेची तिजोरी सावरण्यासाठी अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक विभागाने खर्चात बचत कशी करता येईल, याचा अहवाल पुढील १० दिवसांत स्थायी समितीकडे सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले. स्थायी समितीच्या बैठकांना सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अधिकारी आणि एचआर प्रमुखांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, अपरिहार्य कारणास्तव अनुपस्थित असल्यास पर्यायी प्रतिनिधी पाठवणे अनिवार्य राहील. महापालिका कर्मचाऱ्यांची १०० टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असून, आरोग्य विभागातील कर्मचारी पाणीपुरवठा विभागात कार्यरत असल्याने हजेरी नोंदवली जात नसल्याच्या तक्रारींची तत्काळ शहानिशा करण्याचे निर्देश दिले.

 मोकळ्या मालमत्तांमधून उत्पन्न वाढवा

वापरात नसलेल्या किंवा मोकळ्या पडलेल्या मालमत्तांचे सुयोग्य व्यवस्थापन करून त्यातून मनपाला उत्पन्न मिळवण्याचे नियोजन करावे. मालमत्तांचे संरक्षण ही एका विभागाची नसून सर्व कर्मचाऱ्यांची सामायिक जबाबदारी असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

टेबलवर फाइल्स अडकवून ठेवल्यास जाब

बजेट बुकमधील मंजूर कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. रखडलेल्या कामांचा अहवाल १० दिवसांत द्यावा लागेल. अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाइल्स प्रलंबित राहता कामा नयेत; विलंबाचे ठोस कारण वरिष्ठांना लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारक राहील. मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचा फेरआढावा घेण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या.

“जनतेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा आणि खर्चात बचत व्हावी. बजेटमधील कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत. फाईल्स अडकवून ठेवल्यास लेखी कारण द्यावे लागेल. समन्वयाने शहराच्या विकासाला गती देणे हीच अपेक्षा आहे.” — अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका.

हे सुद्धा वाचा : ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, पहिला नंबर त्यांचाच, त्यानंतर…; हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: महापालिका प्रशासनाला अभिषेक बारणे यांनी कोणते निर्देश दिले?

    Ans: महापालिकेचा कारभार गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासह अनावश्यक खर्च कमी करून विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

  • Que: खर्चात बचतीसाठी विभागप्रमुखांना किती दिवसांची मुदत दिली आहे?

    Ans: प्रत्येक विभागाने खर्चात बचत कशी करता येईल, याचा अहवाल पुढील १० दिवसांत स्थायी समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Que: महापालिका कर्मचाऱ्यांसाठी कोणते नियम बंधनकारक केले आहेत?

    Ans: सर्व कर्मचाऱ्यांची १०० टक्के बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. तसेच स्थायी समितीच्या बैठकींना विभागप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे.

Web Title: Abhishek barne has issued strict instructions to the pimpri chinchwad municipal corporation administration nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट
1

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट

MIDC Water Theft: दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले
2

MIDC Water Theft: दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले
3

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण
4

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.