Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIDC Water Theft: दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले

MIDC Water Theft: बदलापूर-कटाई रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणीचोरी करून टँकरद्वारे पाण्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टँकर माफियांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींची नावे समोर आलेली नाहीत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 03:52 PM
दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले; अधिकारी काय करत होते?

दुष्काळात तेरावा महिना! बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार, MIDC चे ४७ कनेक्शन तोडले; अधिकारी काय करत होते?

Follow Us
Follow Us:
  • बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा मोठा प्रकार!
  • एमआयडीसीचे ४७ कनेक्शन तोडले
  • अधिकारी काय करत होते?
 

MIDC Water Theft: बदलापूर-कटाई रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणीचोरी करून टँकरद्वारे पाण्याची विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टँकर माफियांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींची नावे समोर आलेली नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे, एमआयडीसी प्रशासनाने कटाई नाका ते नेवाळी नाका या परिसरातील तब्बल ४७ पाणी कनेक्शन तोडल्याची माहिती समोर आली आहे.(MIDC Water Theft)

एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणीचोरी

बदलापूर-कटाई रस्त्यावरील एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून अनधिकृतपणे पाणी काढून त्याची टँकरद्वारे विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. पाणीचोरीच्या या प्रकारामुळे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाइपलाइनमधून पाणी काढून त्याची टँकरद्वारे विक्री करण्याचा प्रकार किती काळापासून सुरू होता, तसेच या माध्यमातून किती पाण्याची चोरी झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Shree Chhatrapati Sugar Factory: श्री छत्रपती साखर कारखान्याची दमदार घोडदौड! २० दिवसांत १.९४ लाख टन उसाचे विक्रमी गाळप

कटाई नाका ते नेवाळी नाका परिसरातील ४७ कनेक्शन तोडले

या प्रकरणाची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने कटाई नाका ते नेवाळी नाका या परिसरातील ४७ पाणी कनेक्शन तोडली आहेत. या कनेक्शनच्या माध्यमातून एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून पाण्याची चोरी सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कनेक्शन सुरू असताना प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

एमआयडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी काय करत होते?

एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत होते? इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कनेक्शन सुरू असताना प्रशासनाच्या ही बाब लक्षात कशी आली नाही? पाणीपुरवठा व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. ४७ अनधिकृत कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली असली, तरी पाणीचोरी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती, याचा तपास होणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे.

टँकर माफियांविरोधात गुन्हा; आरोपींची नावे अद्याप गुलदस्त्यात

पाणीचोरी करून टँकरद्वारे पाण्याची विक्री करणाऱ्या टँकर माफियांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप आरोपींची नावे समोर आलेली नाहीत. पाणीचोरीमागील सूत्रधार कोण आहेत? अनधिकृत कनेक्शन कोणी जोडले? या प्रकारातून कोणाला आर्थिक फायदा होत होता? तसेच संबंधित टँकर चालक आणि मालक कोण आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून केवळ अनधिकृत कनेक्शन तोडण्यापुरती कारवाई न करता पाणीचोरीमागील सूत्रधार, टँकर चालक आणि संबंधित व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पाणीचोरीच्या या प्रकरणात पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे आणि आरोपींची नावे कधी समोर येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

💡

Frequently Asked Questions

  • Que: बदलापूर-कटाई रस्त्यावर पाणीचोरीचा प्रकार नेमका काय आहे?

    Ans: एमआयडीसीच्या मुख्य पाइपलाइनमधून अनधिकृतपणे पाणी काढून टँकरद्वारे त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • Que: एमआयडीसी प्रशासनाने किती अनधिकृत पाणी कनेक्शन तोडली आहेत?

    Ans: कटाई नाका ते नेवाळी नाका परिसरातील तब्बल ४७ पाणी कनेक्शन एमआयडीसी प्रशासनाने तोडली आहेत.

  • Que: पाणीचोरी प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: टँकर माफियांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींची नावे समोर आलेली नसल्याने पुढील तपास आणि कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Badlapur katai road water theft midc cuts 47 connections tanker mafia case sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Badlapur
  • maharashtra
  • MIDC

संबंधित बातम्या

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट
1

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
2

अनावश्यक खर्चाला कात्री लावा, 10 दिवसांत बचतीचा अहवाल द्या; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले
3

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण
4

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.