Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Maval Accident News : विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी जात असताना भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मावळमध्ये घडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2026 | 11:06 AM
accident on Pune-Mumbai highway while carrying ShivJyot two yong boy died Shiv Jayanti 2026

accident on Pune-Mumbai highway while carrying ShivJyot two yong boy died Shiv Jayanti 2026

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : सतिश गाडे : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहपूर्ण वातावरण असून शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. दरम्यान, मावळमध्ये (Maval News) आज अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी जात असताना भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Accident News) घडला. या घटनेमुळे मावळ परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील शिंदे घाटेवाडी येथील शिवजयंती तरुण मंडळाचे कार्यकर्ते विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी निघाले होते. यावेळी पुणे–मुंबई महामार्गावरील नारायणगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगात येणाऱ्या MH 14 JA 5111 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारने दुभाजक ओलांडत दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दर्शन बाबू शिंदे (वय १५) आणि ओमकार दत्ता आढळे (वय २३) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घोषणा

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची माहिती समजताच शिंदे घाटेवाडी तसेच आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार; शरद पवारांसह विनोद तावडे, पार्थ पवारही वरिष्ठ सभागृहात

दरम्यान, शिवजयंतीच्या निमित्ताने विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्याचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही त्याच उत्साहात तरुण मंडळाचे कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Accident on pune mumbai highway while carrying shivjyot two yong boy died shiv jayanti 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Accident News
  • maval news
  • Shivjayanti 2026

संबंधित बातम्या

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
1

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
2

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
3

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
4

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.