संग्रहित फोटो
पुणे : वाहतुक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टाॅम टाॅम’ या संस्थेने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार पुणे हे जगातील वाहतुक काेंडीत पहील्या पाच शहरात आहे. तर बंगळूरु हे दुसऱ्या क्रमांकावरील शहर ठरले आहे. टाॅम टाॅम या संस्थेने २०२५ सालच्या वाहतुक व्यवस्थेचा अभ्यास केला. जगातील विविध प्रमुख शहरांतील वाहतुक काेंडीचा अभ्यास करून संस्था दरवर्षी अहवाल सादर करते. संस्थेच्या अहवालानुसार २०२५ मध्ये वाहतूककोंडीमुळे पुणेकरांचे १५२ तास वाया गेले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सरासरी ७१ टक्के असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. शहरात १८ किलोमीटर प्रतितास असा वाहनांचा सरासरी वेग असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२४) तुलनेत टक्क्यांत ५.४ टक्के इतकी वाढ झाली आहे.
संस्थेच्या अहवालातील माहितीनुसार, १५ मिनिटांत पुणेकरांना फक्त ४.५ किलोमिटर अंतराचा प्रवास करता येतो. १० किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी सरासरी ३३ मिन २० सेकंद एवढा वेळ लागतो. २०२५ मधील १६ ऑक्टोबर हा दिवस पुणे शहरातील भीषण वाहतूक कोंडीचा दिवस ठरला. २.७ किलोमीटर अंतर पार करायला तब्बल १५ मिनिटं वेळ लागला होता.
पहिल्या शंभरात भारतातील दहा शहरे
जगातील वाहतूक कोंडीमध्ये मेक्सिको शहर पाहिले, दुसऱ्या क्रमांकावर बंगळूरू, तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचे शहर डब्लिन, चौथ्या क्रमांकावर पोलंड देशातील लॉड्झ शहर तर पाचव्या स्थानी पुणे शहराचा नंबर लागतो. पहील्या शंभर शहरात भारतातील दहा शहरांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई (१८ वे स्थान ), नवी दिल्ली (२३ वे स्थान ), काेलकत्ता ( २९ वे स्थान ), जयपुर ( ३० वे स्थान ), चेन्नई ( ३२ वे स्थान ), हैदराबाद ( ४७ वे स्थान ), एर्नाकुलम ( ५२ वे स्थान ), अहमदाबाद (१०० वे स्थान ).
अहवालातील मुद्दे






