Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

Pune Ganpati Visarjan: मध्यभागात ‘स्पीकर’च्या बाबतीत बहुतेक मंडळांनी मर्यादा पाळल्याचे चित्र दिसत होते. तर काही मंडळांनी दोन पेक्षा अधिक ढोल ताशा आणि इतर पथके लावली होती. दुसरीकडे चार बेस चार टॉप असले तरी आवाज मात्र मोठाच होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 08:08 PM
पुणे विसर्जन मिरवणूक

पुणे विसर्जन मिरवणूक

Follow Us
Follow Us:
  • अखेर 35 तासांनी पुण्याची विसर्जन मिरवणूक संपली
  • यंदा विसर्जन मिरवणुक संपण्यास जवळपास दोन तासांचा वेळ 
  • डीजेचा आवाज तुलनेने कमी असल्याचा दावा पोलिसांनी केला
Pune Ganesh Visarjan 2026: पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक यंदा सुमारे ३४ तास ५२ मिनिटे चाललेल्या मिरवणुकीनंतर सांगता झाली. दोन गणेश मंडळातील वाढलेले अंतर, पोलिसांची संयमी भुमिका आणि मंडळांकडून होणारा अंतराअंतारावर घेतला जाणारा ‘स्टॉप’ यामुळे हा विलंब झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणुक संपण्यास जवळपास दोन तासांचा वेळ लागला. सकाळी ८. ४३ ला सुरू झालेली मिरवणूक शनिवारी रात्री ७.३३ मिनिटांनी संपली.

वैभवशाली परंपरा म्हणून ओळख असलेल्या विसर्जन मिरवणुकीस शुक्रवारी सकाळी पावणे नऊला वाजता प्रारंभ झाला.अत्यंत उत्साही आणि आनंदाच्या वातावरणात सुरू झालेल्या मिरवणूकीत यंदा ‘स्पीकर’ च्या आवाजावर मर्यादा टाकली होती. स्पीकर व्यावसायिक आणि गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी चार ‘टॉप’ आणि चार ‘बेस’ वापरण्याची अनुमती दिली होती. परंतु या चार टॉप’ आणि ‘बेस’च्या माध्यमातून ‘स्पीकर’चा दणदणाट कायम राहीला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्यभागात डीजेचा आवाज तुलनेने कमी असल्याचा दावा पोलिसांनी केला. दुसरीकडे उपनगरांमध्ये मात्र डीजेचा दणदणाटच पाहिला मिळाला.

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

नागरीक विद्यानंद बापट यांनी ‘स्पीकर’च्या विरोधात आवाज उठविल्यामुळे गणेशोत्सवापुर्वीच ‘आवाज’ हा चर्चेचा विषय झाला होता. ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या गेल्या. यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता लवकर होईल अशी अपेक्षा  होती. परंतु, प्रत्यक्षात पोलिसांनी मिरवणुक कधी संपेल यापेक्षा सुरक्षितता महत्वाची ठरविली आणि वेळेच्या गणतीकडे दुर्लक्ष केले. परिणामी गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ३ तास जास्त कालावधी मिरवणूक संपण्यास लागला. मुख्य विसर्जन मिरवणुक असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर शुक्रवारी मानाच्या आणि महत्वाची गणेश मंडळे सहभागी झाली होती.

बेलबाग चौक ( समाधान चौक ) येथे लक्ष्मी रस्त्यावरुन व शिवाजी रस्त्यावरून येणारी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मानाची आणि महत्वाची मंडळे बेलबाग चौकातून मार्गस्थ होण्याची वाट इतर मंडळे पाहत होती. प्रमुख मंडळे मार्गस्थ झाल्यानंतरच बेलबाग चौकातून इतर मंडळे विसर्जन मिरवणुकीत दाखल झाली. प्रमुख गणेश मंडळांनी ढोल ताशा पथकांची दहा मिनिटांचे वादन याकडे देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे देखील काहीसा उशीर झाला.

पोलिसांच्या नियमांकडे दुर्लक्ष

मिरवणुकीसाठी पोलिसांनी गणेश मंडळांना मिरवणुकीत दोन ढोल – ताशा पथक सहभागी करून घेण्यास आणि स्पीकर साठी प्रत्येकी चार बेस आणि टॉपसाठी परवानगी दिली. मध्यभागात ‘स्पीकर’च्या बाबतीत बहुतेक मंडळांनी मर्यादा पाळल्याचे चित्र दिसत होते. तर काही मंडळांनी दोन पेक्षा अधिक ढोल ताशा आणि इतर पथके लावली होती. दुसरीकडे चार बेस चार टॉप असले तरी आवाज मात्र मोठाच होता.

 पोलिसांची रणणीती अपयशी?

मिरवणुकीत दोन मंडळातील अंतर जास्त पडू नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. अनेक ठिकाणी यासाठी अंतर कमी करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी काही वेळा हे अंतर वाढल्याचे दिसले. शुक्रवारी रात्री ‘स्पीकर’ बंद झाल्यानंतर मिरवणुकीचा वेग आणखी मंदावला. काही मंडळांनी ‘ढोल – ताशा’ पथकांना निमंत्रित करून मिरवणुक पुढे चालू ठेवली. ‘स्पीकर’च पर्याय असलेली गणेश मंडळे ही जागेवरच थांबून होती. पहाटे सहाच्या ठोकल्या पुन्हा त्यांनी मिरवणूक सुरू केली. ती शनिवारी रात्री साधारण आठपर्यंत सुरूच होती.
Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत

विसर्जन मिरवणुकीच्या वेळा
– २०१६- २८ तास ३० मिनिटे
– २०१७- २८ तास ०५ मिनिटे
– २०१८- २७ तास १५ मिनिटे
– २०१९- २४ तास
– २०२०- करोनामुळे मिरवणूक नाही
– २०२१- करोनामुळे मिरवणूक नाही
– २०२२- ३१ तास
– २०२३ -२८ तास ४० मिनिटे
– २०२४- २८ तास ३० मिनिटे
– २०२५- ३२ तास २६ मिनिटे
– २०२६- ३४ तास ५२ मिनिटं

Web Title: After 35 hours pune ganesh visarjan mirvanuk end police and pmc arrangement fail in ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • DJ
  • pune ganpati
  • Pune mahapalika
  • Pune Police

संबंधित बातम्या

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…
1

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

Ganesh Visarjan 2026: थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले
2

Ganesh Visarjan 2026: थायलंडच्या पर्यटकांनी केली बाप्पाची आरती; गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याने परदेशी पाहुणे भारावले

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…
3

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
4

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.