Good News ! आता खराब हवामानातही लँडिंग, टेकऑफ करता येणार; 'या' विमानतळावर मिळणार सुविधा
Pune News: भुवनेश्वरहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-1097) विमानाच्या लँडिंगच्या अंतिम टप्प्यात शनिवारी सायंकाळी थरारक प्रसंग घडला. सायंकाळी सहाच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, धावपट्टीवर अचानक कुत्रा दिसल्याने वैमानिकाने लँडिंग रद्द करण्याचा तात्काळ निर्णय घेतला.त्यावेळी विमान अंदाजे ५० ते १०० फूट उंचीवर होते. वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सजगतेने निर्णय घेत पुन्हा हवेत भरारी घेतली, ज्यामुळे मोठा अपघात टळला.
या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, धावपट्टीवर प्राणी कसा पोहोचला, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाच्या दक्षतेमुळे सगळे प्रवासी सुखरूप आहेत.संबंधित यंत्रणांनी या घटनेची दखल घेत सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.
Pune Crime News: इराणी झेंडे आणि खामेनेईंचे फ्लेक्स; पुण्यात खळबळ, पोलीस अलर्टवर
पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसापासून पक्षी आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे विमानाच्या संचलनात बाधा निर्माण होत आहे.यापूर्वी विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी गेल्याची घटना देखील काही दिवसापूर्वीच घडली होती. आता पुन्हा धावपट्टीवर कुत्रा आल्याने प्रवासी सुरक्षाच धोक्यात आली आहे. शनिवारी विमान उतरत असतानाच नेमकी ही घटना घडली. कुत्रा दिसताच विमान परत आकाशाकडे झेपावले. तशातच, उतरण्याच्या मानसिकतेत असलेले प्रवासीही गोंधळले. वैमानिकाने पुन्हा हवेत झेप घेतल्यानंतर ‘गो-अराऊंड’ पद्धतीने घिरट्या घालीत राहिले. विमान अशाप्रकारे हवेत अर्ध्यातासापेक्षा जास्त कालावधीसाठी होते. दरम्यान कुत्र्याला हटवण्यासाठी कर्मचारी धावले आणि अखेर सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे उतरले.
5 विकेट-हॉलच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर, वाचा टाॅप 5 फलंदाज कोणते?
लोहगाव विमानतळावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वीच पुण्याहून उड्डाण करणाऱ्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये कुत्रा आढळल्याने ते उड्डाणही रद्द करावे लागले होते. यामुळे धावपट्टीवर पक्षी, कुत्रे आणि क्वचित प्रसंगी बिबट्या दिसण्याच्या घटनांमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.विमानतळ प्रशासनाने पक्षी व कुत्र्यांना हुसकावण्यासाठी काही यंत्रणा राबवल्या असल्या तरी त्या पुरेशा ठरलेल्या नाहीत, हेच ताज्या घटनेने सिद्ध झाले आहे. प्राण्यांचा वाढता वावर हे केवळ विमान वाहतुकीस अडथळा नसून, संभाव्य जीवितहानीची किंबहूना मोठ्या दुर्घटनेचीच नांदी आहे. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने याकडे आतातरी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर, डिजिसीए अधिकाऱ्यांनी केलेली पाहणी वरवरची मलमपट्टी तर नव्हती ना, असाही संशय या घटनेने बळावला आहे.