Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: पुण्यात आयोजित राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 02:16 PM
अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा
  • एनएसए अजित डोवाल यांचा सन्मान
  • अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव
Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval )  यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अमित शहा यांनी अजित डोवाल यांना पारंपरिक पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, धनादेश आणि ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची प्रत भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात अजित डोवाल यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस कार्यकर्त्यांना धरपकड

देशातील दिग्गजांच्या यादीत अजित डोवाल

या पुरस्कारामुळे अजित डोवाल यांचे नाव या सन्मानाने गौरविण्यात आलेल्या देशातील दिग्गज व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग आणि इंदिरा गांधी यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले की, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आयुष्यभर दिलेल्या असामान्य, धाडसी आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सर्वानुमते अजित डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कारकीर्द

अजित डोवाल हे 1968 बॅचचे केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी असून भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. पोलिस सेवेत असताना त्यांनी पाकिस्तानमधील अंडरकव्हर मोहिमा तसेच मिझोराम शांतता प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या धाडसी कार्याबद्दल त्यांना ‘कीर्ती चक्र’ हा शांततेच्या काळातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कारही मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारे ते देशातील पहिले पोलिस अधिकारी ठरले आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसेवा, राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा गौरव करणारा हा सोहळा विशेष ठरला.

या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असून, पुरस्कार वितरणानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा आणि देशसेवेच्या प्रेरणेचा गौरव केला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार हा देशसेवा, राष्ट्रनिर्माण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जाणारा प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो.

Purandar International Airport साठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Web Title: Ajit doval honoured with national lokmanya tilak award by amit shah in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Ajit Doval
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
1

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
2

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
3

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.