पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या विमानतळ विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आर्थिक गती देण्यासाठी हडको (HUDCO) मार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या कामांना मोठी चालना मिळणार आहे. या बैठकीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्स, कार्गो हाताळणी सुविधा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा कुंभमेळा-2027 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि मालवाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळ विकास प्रकल्पांमध्ये वेळेचे काटेकोर नियोजन, समन्वय आणि निधीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. नवी मुंबई विमानतळाप्रमाणेच पुरंदर विमानतळाचाही विकास वेगाने पूर्ण करून पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरंदर विमानतळ सुरू झाल्यानंतर पुणे परिसरातील वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच उद्योग, निर्यात, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळून राज्याच्या पायाभूत विकासात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.
पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी आणि खानवडी. विमानतळासाठी एकूण ३ हजार एकर इतकी जमीन आवश्यक असून त्यापैकी २ हजार ८०० एकर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची संमती मिळाली आहे, अशी माहिती समोर आली.
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…






