Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP News : डिलिमिटेशन बिलावरून राष्ट्रवादीतच ठिणगी? माझा पक्ष पाठिंबा देणार असेल तर विरोध करणार! शरद पवार गटाच्या नेत्याचं ट्विट

NCP News : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचे संकेत मिळत असतानाच जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी पक्षाच्या भूमिकेला उघड विरोध केला आहे. त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 15, 2026 | 06:30 PM
natasha awhad supriya sule

natasha awhad supriya sule

Follow Us
Follow Us:
  • डिलिमिटेशन बिलावरून राजकारण तापलं
  • राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भूमिकेवरून पक्षातच मतभेद?
  • सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे महाविकास आघाडीतही मतभेद
NCP News : देशभरात डिलिमिटेशन बिलावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेससह INDIA आघाडीने डिलिमिटेशन बिलाला कडाडून विरोध केला. लोकसभेतही विरोधी पक्षाच्या भिमिकेमुळे आणि पुरेसे संख्याबळ न मिळाल्यामुळे या बिलास मंजुरी मिळाली नाही. आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात डिलिमिटेशन बिलावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत असताना दुसरीकडे आता पक्षातूनच विरोधाचा सूर उमटू लागला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिलाच्या पाठिंब्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पक्षाच्या संभाव्य भूमिकेला थेट विरोध केला आहे.

डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिल्यास विरोध करणार!

नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. माझा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल, तर मी त्याला तीव्र विरोध करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक असली तरी सध्याचं प्रस्तावित विधेयक विरोधी पक्षांचं राजकीय नुकसान करून भाजपला फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने आणलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसंच, या विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचं आणि संविधानाचं मोठं नुकसान करण्यासारखं असल्याचंही नताशा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्षाने आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भाजपवर टीका, स्वपक्षालाही सुनावलं!

विशेष म्हणजे नताशा आव्हाड यांनी केवळ भाजपवर टीका करून थांबण्याऐवजी आपल्या पक्षालाही थेट इशारा दिला आहे. भाजपची लोकप्रियता कमी होत असल्याने हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने डिलिमिटेशन विधेयकाबाबत कोणती भूमिका घ्यावी, यावर पक्षांतर्गत चर्चेला वेगळंच वळण मिळालं आहे.

माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो! — Natasha Awhad (@NatashaASpeaks) November 15, 2026

सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर राजकीय पेच

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सर्वच राज्यांमध्ये 50 टक्के जागा वाढवल्यास डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे संकेत दिले होते. मात्र काँग्रेसने या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतही मतभेद समोर आले आहेत.

आता त्यात नताशा आव्हाड यांच्या ट्विटची भर पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट या विधेयकाबाबत नेमकी काय भूमिका घेतो आणि नताशा यांच्या विरोधाची पक्षाकडून कशी दखल घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले

💡

Frequently Asked Questions

  • Que: नताशा आव्हाड कोण आहेत?

    Ans: नताशा आव्हाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत.

  • Que: नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन बिलाला विरोध का केला?

    Ans: त्यांच्या मते, प्रस्तावित विधेयकामुळे विरोधी पक्षांना राजकीय नुकसान होऊ शकतं आणि भाजपला अवाजवी फायदा मिळू शकतो. त्यामुळे त्यांनी या विधेयकाला विरोध केला आहे.

  • Que: सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिलाबाबत काय म्हटलं होतं?

    Ans: सर्वच राज्यांमध्ये 50 टक्के जागा वाढवल्यास डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले होते.

Web Title: Ncp news natasha awhad opposes delimitation bill ncp sharad pawar faction vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • NCP News
  • NCP Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
1

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं
2

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
3

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’
4

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.