Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक मराठी परिषदेत मराठी भाषेतील सर्व घटकांचा समावेश केला जाईल: मंत्री उदय सामंत

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घोषित केले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 19, 2025 | 08:12 PM
मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी साहित्य संमेलन पुरस्कार जाहीर

मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी साहित्य संमेलन पुरस्कार जाहीर

Follow Us
Follow Us:

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, पुण्यात पहिले जागतिक मराठी संमेलन होत आहे. हे सांगताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ही परिषद प्रथम मुंबईत, नंतर वाशीमध्ये आणि आता पुण्यात होत आहे. ही परिषद फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. जगभरात मराठी साहित्य पोहचविण्यासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून मधु मंगेश कर्णिक यांची निवड सर्वानुमते करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधून यंदापासून मराठीचे साहित्य जगभरात पोहचविणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर पुण्यात होणाऱ्या या संमेलनाला परदेशातून ५०० हून अधिक नागरिक आणि साहित्यिक येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

सासवड मुख्याधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’; नेमका प्रकार तरी काय? वाचा सविस्तर…

संत साहित्य, अभंगवाणी, लोककला, महिला साहित्य, बालसाहित्य, मराठीतील आधुनिक ट्रेंड, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गाण्यांवर आधारित गाणी, भक्तीगीते आणि आधुनिक गाणी इत्यादी विविध टप्प्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जाईल. फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य सभागृहात तरुण पिढीसोबत विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवर कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी १०० पुस्तकांचे स्टॉल लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि आणखी स्टॉल लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

सामंत म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या विकासासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. याशिवाय, अभिजात भाषेत समाविष्ट असलेली प्राकृत भाषा देखील मराठीचे मूळ आहे, त्यामुळे तिचा वाटा मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. दरम्यान उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तर जगभरातील बृहन मंडळाचे प्रतिनिधीही या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. 

बैठकीनंतर मंत्री श्री सामंत यांनी विश्व मराठी संमेलन स्थळाची पाहणी केली आणि विविध सूचना दिल्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष योगी निरंजन नाथ, प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. माधवी वैद्य इत्यादी विविध साहित्यिकांसह, फर्ग्युसन कॉलेजच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. रुपाली शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे मराठी भाषा विभाग प्रमुख उपस्थित होते.

Congress Nagpur Protest : सरसंघचालक मोहन भागवतांच्या अटकेची मागणी; काँग्रेचं नागपुरात आंदोलन

पुण्यात होणाऱ्या या संमेलनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष  आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देखील या संमेलनाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्याशिवाय इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: All components of marathi language will be included in the world marathi conference minister uday samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
1

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस
2

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको
3

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन
4

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.