Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन

Mangal Prabhat Lodha: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान या योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांना विविध स्वरूपाचे सहाय्य दिले जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 21, 2026 | 05:54 PM
रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळावा

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळावा

Follow Us
Follow Us:
  • राज्यात २९ सप्टेंबरला एक हजार रोजगार मेळावे
  • कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
  • ‘लोकसंवाद’ अभियानातून रोजगाराच्या संधींची जनजागृती
मुंबई: राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत माहिती देण्यात आली.

मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, उपाध्यक्ष निंगेश कोरे, राजीव मेहता, सागर पेंढारक, आयेशा कुरेशी इतर पदाधिकारी, सदस्य व भक्तगण यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे, तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना विविध आस्थापना व उद्योगांमधील रोजगाराच्या संधींची माहिती मिळणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रमुख योजनांबाबत जनजागृती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय तसेच इतर दुर्बल घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मॅट्रिकोत्तर, सावित्रीबाई फुले व राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य दिले जाते. स्वाधार व शासकीय वसतिगृह योजनांतून निवास व आवश्यक सुविधा उपलब्ध होतात. रमाई आवास योजनेतून घरकुलासाठी आर्थिक सहाय्य, तर मुख्यमंत्री वयोश्री व संजय गांधी निराधार योजनेतून ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांना आधार दिला जातो. या योजनांद्वारे शिक्षण, निवास, आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षेला बळ देत दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती लोकसंवाद अभियान अंतर्गत देण्यात आली.

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण व सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना आणि सेवांची माहिती

महिला व बालकांच्या संरक्षण, पोषण, शिक्षण, सक्षमीकरण आणि पुनर्वसनासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वन स्टॉप सेंटर, शक्ती सदन, आदर्श अंगणवाडी, बेबी केअर किट, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि पोषण अभियान या योजनांच्या माध्यमातून महिला व बालकांना विविध स्वरूपाचे सहाय्य दिले जाते.

अंगणवाडी सेवांद्वारे पूरक पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच पोषणविषयक मार्गदर्शन दिले जाते. महिलांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन, तर बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तक्रारींवर कार्यवाही केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येते. महिला हेल्पलाईन १५५२०९ आणि बाल हेल्पलाईन १०९८ या सुविधांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने त्याच ठिकाणी शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून, त्यांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळत असल्याने ‘लोकसंवाद’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Mangal prabhat lodha appeal to youth attend 29 september one thousand employment summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Employment Guarantee Scheme
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • New employment

संबंधित बातम्या

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी
1

Rojgar Mahakumbh Maharashtra: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुड न्यूज! १,५८८ नियोक्ते सहभागी, ७१,९३९ प्राथमिक रोजगार संधी

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
2

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
3

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
4

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.