Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी धावले, पण काळाचा घाला! पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा मृत्यू

गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. जावेद बागसिराज असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 27, 2026 | 12:30 AM
ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी धावले, पण काळाचा घाला! पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा मृत्यू

ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी धावले, पण काळाचा घाला! पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू
  • जावेद २०१० पासून पोलीस दलात कार्यरत होते
  • पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलावर शोककळा
पिंपरी : पिंपरी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन गुन्हेगारांना पकडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (२५ ऑक्टोबर) रात्री उशिरा सापळा लावला. एका गुन्हेगाराला पकडल्यानंतर पळून जाणाऱ्या दुसऱ्या गुन्हेगाराला पाठलाग करून पकडत असताना गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. जावेद बागसिराज असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

जावेद बागसिराज यांचे कुटुंब मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. त्यांचे वडील पुणे शहरात आले होते. त्यांचा जन्म पुणे शहरात झाला. ते २०१० मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. सुरुवातीला आठ वर्ष पुणे पोलीस दलातील हडपसर, मुंढवा पोलीस ठाण्यांत सेवा केली. २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर ते पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात आले. इथे त्यांनी सुरुवातीला पिंपरी आणि त्यानंतर गुन्हे शाखेत काम केले. सध्या ते गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेल मध्ये कार्यरत होते.

रविवारी रात्री उशिरा जावेद यांना एक टीप मिळाली. संशयित दोघेजण संत तुकाराम नगर येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन संत तुकाराम नगर मधील आंतरिक सोसायटी जवळ सापळा लावला. एमडी विक्रीसाठी आलेल्या एकाला त्यांनी पकडले. दरम्यान, पकडलेल्या संशयित आरोपीचा दुसरा साथीदार पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी जावेद हे त्याच्या मागे धावले. धावत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते खाली कोसळले.

हे सुद्धा वाचा :  भाजपाने काँग्रेसला संस्कृती व संस्कार शिकवू नये, मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला; हर्षवर्धन सपकाळांची टीका

जावेद यांच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तात्काळ पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी त्यांना आणखी एक हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जावेद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १२ वर्षांची एक मुलगी आणि ७ वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. जावेद यांचा दफनविधी कसबा येथील कब्रिस्तान येथे सोमवारी दुपारी झाला. जावेद हे अतिशय कष्टाळू होते. त्यांचे काम वाखणण्याजोगे असल्याच्या भावना वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवडमध्ये मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: जावेद बागसिराज असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेलमध्ये कार्यरत होते.

  • Que: जावेद बागसिराज यांच्यासोबत नेमकी घटना काय घडली?

    Ans: संत तुकाराम नगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या संशयितांवर कारवाई करताना एक आरोपी पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करत असताना जावेद यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: जावेद बागसिराज किती वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते?

    Ans: जावेद बागसिराज हे २०१० मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी हडपसर, मुंढवा आणि पिंपरी येथे सेवा बजावली होती. २०१८ नंतर ते पिंपरी-चिंचवड पोलीस दलात कार्यरत होते.

Web Title: An incident has occurred in which police personnel javed bagsiraj has died nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Death
  • maharashtra
  • Police News

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

शेतीच्या कामासाठी नदीवर गेले, पण परतलेच नाहीत! वीजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू
3

शेतीच्या कामासाठी नदीवर गेले, पण परतलेच नाहीत! वीजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
4

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.