सौजन्य - नवराष्ट्र टीम
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काँग्रेसची विधवा म्हटले, राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचे शब्द वापरले. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना राज्यसभेत शूर्पणखा असे म्हटले. पचास करोड की गर्लफ्रेंड, ममता बॅनर्जी यांच्याबद्दल दीदी ओ दीदी असे अनेक शब्द पंतप्रधान मोदी यांनी वापरले. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत चारित्र्यहनन केले. मल्लिकार्जून खरगे यांनी उत्तराखंड मध्ये एक जाहीर सभा घेतल्यानंतर त्या जागेचे कथित शुद्धीकरण करण्यात आले, त्यावेळी भाजपा मुग गिळून गप्प बसली होती.
दुसऱ्याची संस्कृती काढण्याआधी स्वतःची संस्कृती पहावी. ज्या पक्षाचा सर्वोच्च नेताच अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा जाहीरपणे वापरतो, महिलांबद्दल अपमानकारक भाषा वापरतो त्यांनी काँग्रेसला शिकवू नये. खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाची इकोसिस्टिम जागी झाली आहे. त्यांचा हा प्रकार म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असा आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील १३ वर्षांपासून सत्तेत आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला सांगण्यासारखे भाजपाकडे काहीही नाही म्हणून ते मुद्दा बनवू पहात आहेत. मोदी सरकारच्या मंत्र्यांचे नाव अत्यंत अघोरी व अश्लाघ्य एपस्टिन फाईलमध्ये आलेले आहे, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. राहुल गांधी यांनी मोदी-शाह व भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते कशाचेही भांडवल करू पहात आहेत पण जनता सुज्ञ आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Ans: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भाषेवरही प्रश्न उपस्थित केले.
Ans: भाजपचे नेते विरोधी पक्षांच्या नेत्यांचे चारित्र्यहनन करतात आणि महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरतात, असा आरोप सपकाळ यांनी केला. हे आरोप त्यांनी राजकीय टीकेदरम्यान केले.
Ans: खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपने मोठा मुद्दा निर्माण केला असून, सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.






