Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठीचे बहुचर्चित बेमुदत धरणे आंदोलन २ ऑक्टोबर रोजी सकाळी सुरू होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2026 | 03:49 PM
MPSC विद्यार्थ्यांचे 'या' तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

MPSC विद्यार्थ्यांचे 'या' तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

Follow Us
Follow Us:
  • MPSC विद्यार्थ्यांचे ‘पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन
  • रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
  • नेमकं मागण्या काय?
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठीचे बहुचर्चित बेमुदत धरणे आंदोलन २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून एस. एम. जोशी पूल, नवी पेठ येथे सुरू होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तांत्रिक कारणांमुळे २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला परवानगी देता येत नसली, तरी २ ऑक्टोबर रोजी (गांधी जयंती) मात्र आंदोलनास परवानगी देण्याबाबत पोलिसांनी सहमती दर्शविली आहे.

 

अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

MPSC विद्यार्थ्यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाद्वारे आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी “त्यांचा कार्यकाळ आताच सुरू झाला असल्याने राजीनामा देता येणार नाही,” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. परंतु, अलीकडच्या कालावधीमध्ये विवेक भीमनवार यांच्या कारकिर्दीत काही पेपर फुटीची प्रकरणे समोर आल्यामुळे विद्यार्थी पूर्णतः आक्रमक झाले आहेत. अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय आता आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत येत्या दोन दिवसांमध्ये MPSC विद्यार्थी आंदोलकांची एक संयुक्त बैठक होणार असून यात विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह इतर तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करणार: रोहित पवार

या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. रोहित पवार म्हणाले, “सदर आंदोलन हे पूर्णतः अराजकीय स्वरूपाचे असून केवळ विद्यार्थी हिताचे असल्याने यामध्ये आपण सहभागी आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळणे, परीक्षांची पेपरफुटी थांबणे या प्रमुख विषयांसाठी आपण विद्यार्थ्यांसाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्यास तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी यात वेळीच लक्ष घालून विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेणे हेच योग्य ठरेल.”

हे सुद्धा वाचा : पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

गरज पडल्यास राहुल गांधीही आंदोलनात उपस्थित राहणार : डॉ. विश्वजीत कदम

दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका काँग्रेस पक्षाची असून या आंदोलनाला काँग्रेसनेही मोठी ताकद दिली आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांशी यापूर्वीच संवाद साधलेला असून त्यांच्या मागण्या सोडवण्या संदर्भामध्ये ते आग्रही आहेत. या आंदोलनामध्ये मी स्वतः पक्ष पातळीवर सहभागी होणार असून, गरज पडल्यास राहुल गांधी हे देखील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यात उपस्थित राहतील.”

पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीला विद्यार्थी प्रतिनिधी व विविध पक्षीय नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे , रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविकांत वरपे, माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनील माने , प्रथमेश अबनावे यांच्यासह आंदोलकांचे प्रमुख आयोजक व विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कांबळे, प्रमोद पाटील, विश्वजीत जाधव, संग्राम नरळे, किरण जगताप, सिद्धांत जांभुळकर, नितीन गीते, नितीन आंधळे, अजिनाथ केदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: An indefinite sit in protest by mpsc students is set to begin in pune on october 2nd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • MLA Rohit Pawar
  • MPSC
  • pune news

संबंधित बातम्या

Sinhgad Colleges News: पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा निर्णय! सिंहगड संस्थवर ३ वर्षांसाठी प्रशासक नियुक्त
1

Sinhgad Colleges News: पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठा निर्णय! सिंहगड संस्थवर ३ वर्षांसाठी प्रशासक नियुक्त

पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन
2

पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा
3

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती
4

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.