Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्यात रस्ते खोदाईला परवानगी मात्र…; ‘आपला परीसर’ संस्थेने नेमकी काय केली मागणी? पहाच…

शहराच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांकडून तब्बल ४५० कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सुमारे १२०० सीसीटीव्ही शहरात बसविले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 22, 2025 | 06:29 PM
Pune News: पुण्यात रस्ते खोदाईला परवानगी मात्र...; 'आपला परीसर' संस्थेने नेमकी काय केली मागणी? पहाच...

Pune News: पुण्यात रस्ते खोदाईला परवानगी मात्र...; 'आपला परीसर' संस्थेने नेमकी काय केली मागणी? पहाच...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: विविध कारणांसाठी शहरातील रस्ते खाेदाईला परवानगी दिली असुन महापालिकेने आता  रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून भरीव निधी आणावा, अशी मागणी आपला परीसर या संस्थेने केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट सिटीचे प्रकल्प तसेच एटीएमएस सिग्नल यंत्रणेसाठी ५०० किलोमीटरची रस्ते खोदाईची परवानगी देताना खाेदाई शुल्क माफ केले जाण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभुमीवर ही मागणी केली गेली आहे.

शहराच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांकडून तब्बल ४५० कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले सुमारे १२०० सीसीटीव्ही शहरात बसविले जाणार आहेत. सीसीटीव्हीच्या नेटवर्कसाठी तब्बल ५०० किलोमीटरचे रस्ते खोदण्यात येणार आहेत.पोलीस आणि महापालिकेच्या खोदाईने पुढील वर्षभरात १ हजार किलोमीटरची रस्ते खोदाई होणार आहे. त्याबाबतचे प्रस्ताव महापालिकेकडे दाखल झाले असून, या खोदाईचे तब्बल ६०० कोटींचे शुल्क माफ करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

या खोदाईनंतरही संबधित रस्त्यांची दुरूस्ती महापालिकेनेच करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे पुन्हा या रस्ते दुरूस्तीचा २०० ते ३०० कोटींचा भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. हे सीसीटीव्ही बसविण्याचे काम देण्यात आलेल्या कंपनीकडून हे खोदाईचे प्रस्ताव महापालिकेकडे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, पालिकेकडून जागेची पाहणीही करण्यात आले आहे.

भरीव निधी आणा; मग शुल्कात माफी द्या

गृह खात्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीचे इतिवृत्तात मुद्दा क्रमांक दोन फेज २ प्रकल्पासाठी आरओडब्ल्यू/ आरआय शुल्क माफ करण्यासाठी पत्र दिले जाणार आहे. या पत्रानुसार महापालिकेने थेट शुल्क माफीचा विचार करु नये. शहरातल्या लोकांना आर्थिक तोशिष न बसता हा प्रकल्प कशाप्रकारे पुढे नेता येईल यासंदर्भात पुणे शहरातील‌ खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, सुनील कांबळे, चेतन तुपे, योगेश टिळेकर आदी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्याकडून राज्य सरकारकडून भरीव निधी आणावा आणि मग शुल्कामध्ये माफी द्यावी, अशी मागणी आपला परिसरचे आणि माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

आशादायक बातमी! पुण्याची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार; रिंगरोडच्या सर्व टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण

पुण्याची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून, यापूर्वी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट देण्यात आली आहेत. तर आता उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन टप्प्यासाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रिंगरोडच्या १२ ही टप्प्यांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे आता भूमिपुजन लवकरच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Apla parisar deman approve fund by maharashtra government for punr raod work marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Indian Roads
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

ऑफिसर अन् कंत्राटदार झाले मालामाल; रस्त्यांच्या खड्ड्यांचे कधीच नाही होणार सुधार
1

ऑफिसर अन् कंत्राटदार झाले मालामाल; रस्त्यांच्या खड्ड्यांचे कधीच नाही होणार सुधार

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
2

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला
3

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम
4

पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.