
Pune Metro, Hinjawadi Metro, Metro Line 3, Diwali 2026, Shivajinagar Metro,
दिवाळीनिमित्त रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे मेट्रो लाईन ३ ची सेवा सुधारित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. मेट्रोची पहिली सेवा सकाळी ६:०० वाजता सुरू होईल. तसेच, दोन्ही मार्गांवरील शेवटच्या मेट्रोच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
माण ते जिल्हा न्यायालय : सायंकाळी ७:४० वाजता (नेहमीच्या रात्री १०:३० वाजण्याऐवजी).
जिल्हा न्यायालय ते माण : रात्री ८:४० वाजता (नेहमीच्या रात्री ११:४० वाजण्याऐवजी).
पुणे मेट्रो लाईन १ आणि २ ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईन ३ सोबतची जोडसेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या विविध मार्गांदरम्यान प्रवाशांना विनासायास प्रवास आणि मार्गबदल करता येणार आहे.
प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आवाहन करण्यात येत आहे. महामेट्रोतर्फे मेट्रो लाईन १ आणि २ च्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलांच्या अनुषंगाने पुणे मेट्रो लाईन ३ च्या वेळापत्रकातही हा बदल करण्यात आला आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ सुरू झाल्यापासून आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास आता काही मिनिटांतच पूर्ण होतो, परंतु मेट्रो सेवेच्या शुभारंभामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आयटी कर्मचारी कुणाल धांडे यांच्या मते, त्यांना आर.के. लक्ष्मण स्टेशनवरून टीसीएसपर्यंत पोहोचायला फक्त २२ मिनिटे लागली. प्रवाशांनी स्टेशनखालील दुचाकी पार्किंग सुविधा आणि सोयीस्कर तिकीट प्रणालीचेही कौतुक केले.
मेट्रोच्या शुभारंभाने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरा कॅब किंवा खाजगी वाहनांनी प्रवास करताना होणारा त्रास आणि सुरक्षेची चिंता या पार्श्वभूमीवर, आता त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. पहिली महिला प्रवासी शिवानी इंद्रे म्हणाल्या की, मी अनेक महिन्यांपासून मेट्रो सेवेची वाट पाहत होते. रात्री कॅबने प्रवास करताना भीती वाटायची, पण मेट्रो सुरू झाल्यापासून प्रवास अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त झाला आहे.
Ans: ८ नोव्हेंबर रोजी दोन्ही मार्गांवरील पहिली मेट्रो सेवा सकाळी ६:०० वाजता नेहमीप्रमाणे सुरू होईल.
Ans: माण ते जिल्हा न्यायालय मार्गावरील शेवटची मेट्रो नेहमीच्या रात्री १०:३० वाजण्याऐवजी सायंकाळी ७:४० वाजता सुटेल.
Ans: जिल्हा न्यायालय ते माण या मार्गावरील शेवटची मेट्रो गाडी नेहमीच्या रात्री ११:४० वाजण्याऐवजी रात्री ८:४० वाजता सुटेल.