Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

Ganesotsav: गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जगभर पोहोचविण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 09:15 PM
pune festival

pune festival

Follow Us
Follow Us:
  • कोणालाही त्रास न होता गणेशोत्सव साजरा करा – आशिष शेलार
  • नियमांच्या चौकटीत सण साजरा करण्याचे आवाहन
  • पुण्यात प्रथमच राज्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 
पुणे/Ganesotsav: गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करून कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी केले. शहरात गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या वापराबाबत चर्चा सुरू असताना शेलार यांनी हे आवाहन केले.

गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर पुण्यात प्रथमच राज्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शनिवारवाड्यावर हा महोत्सव पार पडला. आशिष शेलार यांनी महोत्सवाला भेट देऊन कलाकार आणि पुणेकरांना शुभेच्छा दिल्या.

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्वांनी एकत्र येऊन जनतेचा विचार करावा. नियमांच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करत समाजहिताचे काम करावे. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत शेलार म्हणाले की, गणेशोत्सवातील सहभाग, सामाजिक आणि राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी आणि विविध देखावे यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे.

गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जगभर पोहोचविण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. पुणेकरांनी या संकेतस्थळावर घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील छायाचित्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरांच्या कथा शेअर कराव्यात, असे आवाहन शेलार यांनी केले. या माध्यमातून गणेशोत्सवाची माहिती जगभर पोहोचवून त्याला वैश्विक सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

 

श्रीकृष्ण मंडळाने उभारला ‘चॉकलेटचा बंगला’

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला… हे लोकप्रिय बालगीत ऐकताना लहान मुलांच्या कल्पनेत उभा राहणारा चॉकलेटचा बंगला यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. गणेशोत्सवामध्ये केवळ धार्मिक विषयांवरील किंवा भव्यदिव्य देखावेच नव्हे, तर लहान मुलांचे बालविश्व आणि आवडीनिवडी केंद्रस्थानी ठेवून साकारलेले देखावे पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

Web Title: Ashish shelar statement about pune dj and loud speaker pune festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Ganeshotsav 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
2

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’
3

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’

‘श्रीमंत’ बाप्पाचा राजेशाही थाट! दगडूशेठच्या चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य
4

‘श्रीमंत’ बाप्पाचा राजेशाही थाट! दगडूशेठच्या चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.