Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: अनधिकृत होर्डिंग्जबाबत अधिकारी अनभिज्ञ! पुण्यात होर्डिंग व फ्लेक्सचा सुळसुळाट? वाचा सविस्तर…

शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग आहेत. १ एप्रिल २०२४ ते ६ मार्च २०२५ या कालावधीत २३६ अनधिकृत होडिंगवर कारवाई केली.वर्षभरात होडिंग व फ्लेक्सच्या परवान्यातून ३१ कोटी १० लाख ८२ हजार ९८० रुपये उत्पन्न मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2025 | 09:49 PM
Pune News: अनधिकृत होर्डिंग्जबाबत अधिकारी अनभिज्ञ! पुण्यात होर्डिंग व फ्लेक्सचा सुळसुळाट? वाचा सविस्तर…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहरात सगळीकडे होर्डिंगचे व फ्लेक्सचा सुळसुळाट पाहायला मिळत असताना महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे शहरातील व समाविष्ट गावांमधील अनधिकृत होर्डिंगची माहितीच नाही. ज्यांनी रीतसर परवानगी घेतली आणि ज्या होर्डिंगवर कारवाई करण्यात आली, याचीच माहिती प्रशासनाकडे आहे. दरम्यान, शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग असून, वर्षभरात २३६ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिली आहे. तसेच होर्डिंग व फ्लेक्सच्या परवान्यातून ३१ कोटी, तर कारवाईतून दोन कोटी उत्पन्न मिळाले आहे.

महापालिका हद्दीत कोठेही होर्डिंग किंवा फ्लेक्स उभे करण्यासाठी आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. महापालिकेने परवानगी दिलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची व दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी संबंधित होर्डिंग मालकावर असते. परवानगी दिलेल्या कालावधीनंतर संबंधितांनी सदर जाहिरात काढली नाही, तर महापालिकेकडून त्याच्यावर कारवाई केली जाते.

मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील विविध रस्ते, चौक, पदपथ, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग आणि फ्लेक्स उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते. अशा बेकायदेशीर जाहीरातबाजीवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांचे असणारे लागेबांधे आणि त्याला मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे कारवाईला लगाम लागतो. त्यामुळे शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजी, जाहिरातबाजी आणि होर्डिंगचा आलेख दिवसेंदिवस वाढताच आहे. परिणामी शहराचे विद्रुपीकरण होते.

PCMC News: ‘या ‘होर्डिंग्जला कायदेशीर म्हणावं की बेकायदेशीर? पालिकेच्या उपक्रमात राजकारण्यांचा अडथळा? वाचा सविस्तर…

कारवाई केलेल्या होर्डिंगला प्रत्येकी ५० हजार रुपये दंड केला जातो, तर अनधिकृत फ्लेक्स व जाहिरात फलकाला प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला जातो. ज्या होर्डिंग मालकांनी शुल्क भरून परवाना घेतला आहे किंवा परवान्याचे नूतनीकरण केले आहे, अशाच होर्डिंगची माहिती आकाशचिन्ह विभागाकडे आहे. तसेच कारवाई केलेल्या होर्डिंगची व फ्लेक्सची माहिती आहे, कारवाई न झालेल्या व परवानाही नसलेल्या शहरातील होर्डिंगची माहिती आकाशचिन्ह विभागाकडे नाही. ही माहिती विचारल्यानंतर केवळ कारवाईची माहिती दिली जाते. त्यामुळे या विभागाचा कारभार आंधळं दळतं आणि कुत्र पिट खातं अशी असल्याचे स्पष्ट होत आहे. रस्त्यालगतच्या होर्डिंग्ज पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारण पादचाऱ्यांना चालताना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कारवाईचे स्वप्न हवेतच

अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्सबाजीमुळे होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी फ्लेक्स छपाई करणान्यांसाठी काही नियमावली जारी करून त्याचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही

एका परवान्यावर अनेक होर्डिंग्जचीही माहिती नाही

एका होर्डिंगला दिलेल्या परवानगीचा वापर करून दुसऱ्या एका ठिकाणी त्याच नंबरचे होर्डिंग उभारल्याचा
प्रकार दोन वर्षांपूर्वी मुंढवा परिसरात उजेडात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरातील इतर होर्डिंगही या अनुषंगाने तपासणी करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे प्रशासनाकडे अशी माहिती नाही.

आकाश चिन्ह विभागाने काय माहिती दिली

शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग आहेत. १ एप्रिल २०२४ ते ६ मार्च २०२५ या कालावधीत २३६ अनधिकृत होडिंगवर कारवाई केली.वर्षभरात होडिंग व फ्लेक्सच्या परवान्यातून ३१ कोटी १० लाख ८२ हजार ९८० रुपये उत्पन्न मिळाले. वर्षभरात अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्ससबॅनरवरील कारवाईतून १ कोटी ९० लाख ५ हजार ५ रुपये दंड वसूल केला.वर्षभरात अनधिकृतपणे उभारलेल्या ३० होर्डिंगवर गुन्हे दाखल केले.अनधिकृत होडिंग व फ्लेक्स उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी १२१ तक्रारी अर्ज पोलिस ठाण्यात दिलेत.

वारंवार होडिंग व फ्लेक्सवर कारवाई केली जाते. याशिवाय परवाना निरीक्षकांनी केलेल्या पाहणीमध्ये अनधिकृत आढळणाऱ्या होडिंग व फ्लेक्सवरही कारवाई केली जाते. अनधिकृत होर्डिंगसंदर्भात सर्व्हे करण्यासाठी एजन्सी नेमली आहे, त्या एजन्सीकडून माहिती मागण्यात आली आहे, ती लवकरच मिळेल.
– प्रशांत ठोंबरे, विभागप्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

Web Title: Authorities unaware of unauthorized hoardings know the details pune corporation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Illegal Hoarding
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.