Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा, अनेक महिलांची फसवणूक; बाबा कांबळेंचा आरोप

महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या पिंक रिक्षा योजनेत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 03:26 PM
पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा, अनेक महिलांची फसवणूक; बाबा कांबळेंचा आरोप

पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा, अनेक महिलांची फसवणूक; बाबा कांबळेंचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा
  • अनेक महिलांची फसवणूक
  • बाबा कांबळेंचा आरोप
पिंपरी : महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या पिंक रिक्षा योजनेत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा पुरवून लाभार्थी महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा दावा त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.

 

डॉ. कांबळे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत १० हजार महिलांना स्वावलंबी करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात वितरित करण्यात आलेल्या ई-रिक्षा तांत्रिक निकषांनुसार नसून त्या वापरण्यास धोकादायक ठरत आहेत. साध्या चढणीवर रिक्षा मागे सरकतात, अपेक्षित ११० किलोमीटरऐवजी केवळ ७० ते ८० किलोमीटरपर्यंतच रेंज मिळते, तसेच अनेक रिक्षांना आरटीओ पासिंगही मिळालेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

निविदा प्रक्रियेतील अटींचे उल्लंघन करून कमी क्षमतेच्या बॅटऱ्या, अपूर्ण सुरक्षा मानके आणि निकृष्ट दर्जाची बांधणी असलेल्या रिक्षांचे वितरण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्याचे त्यांनी नमूद केले. योजनेत पारंपरिक ऑटो रिक्षांऐवजी कमी क्षमतेच्या ई-रिक्षा देण्यात आल्याने महिलांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, बँकेचे हप्ते भरणे कठीण होत असून अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले असल्याची व्यथा समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-निगडी मेट्रोपासून पाणीप्रश्नापर्यंत…; पिंपरी-चिंचवडच्या १० प्रश्नांवर सरकारकडून आश्वासन

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि लाभार्थींना दर्जेदार वाहनांचा पुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने केली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषदेत आंबेगावला पुन्हा मान; वळसे पाटील कुटुंबाच वर्चस्व पुन्हा सिद्ध

यावेळी उपस्थित महिलांनी रडत आपले अनुभव कथन केले. “स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून भंगार गाड्या आमच्या गळ्यात मारल्या,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाने पुढील १५ दिवसांत या प्रकरणाची दखल घेऊन तांत्रिक ऑडिट करावे आणि आम्हाला रिचार्ज चेंज करून ठेवा,L5, ऑटो रिक्षा मिळाव्यात आणि दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंक रिक्षा चालक महिलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

Web Title: Baba kamble has alleged a scam in the pink rickshaw scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • auto rickshaw
  • CM Devedra Fadnavis
  • rickshaw driver

संबंधित बातम्या

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान
1

पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी
2

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा; काँग्रेसची मागणी

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार
3

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड
4

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.