Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

इंदापूर तालुक्यातील माळवाडी परिसरात अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जिलेटिनच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 07, 2026 | 12:30 AM
वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Follow Us
Follow Us:

इंदापूर : उजनी जलाशयाच्या पात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंदापूर तालुक्यातील माळवाडी परिसरात अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जिलेटिनच्या साहाय्याने उद‌्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याने उजनी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

उजनी जलाशयाच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आणि पार्श्वभूमीवर महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत माळवाडी परिसरात महसूल विभागाच्या पथकाने पाहणी केली असता वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन बोटी आढळून आल्या. पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित बोटी ताब्यात घेतल्या.

या बोटींचा पुन्हा अवैध वाळू उपशासाठी वापर होऊ नये, यासाठी त्या जिलेटिनच्या साहाय्याने जलाशयाच्या पात्रातच उद‌्ध्वस्त करण्यात आल्या. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारा लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि नायब तहसीलदार स्वाती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पांडुरंग कोळगे, माळवाडीचे मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, वैभव मुळे, भास्कर घोळवे, तसेच पोलीस पाटील अरुण कांबळे व सुनील राऊत यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू उपशावर यापुढेही कारवाई सुरूच!

उजनी जलाशयातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : ‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

उजनी जलाशयाच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माळवाडी परिसरातील तीन बोटी उद‌्ध्वस्त करण्याच्या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाचा स्पष्ट संदेश मिळाला असून, आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: The revenue department has carried out a swift crackdown on illegal sand mining in the malwadi area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • indapur news
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
1

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
2

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
3

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
4

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.