Bhama Askhed Project: पिंपरी-निगडी मेट्रोपासून पाणीप्रश्नापर्यंत...; पिंपरी-चिंचवडच्या १० प्रश्नांवर सरकारकडून आश्वासन
Bhama Askhed Project: पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो, पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर राज्य सरकारने विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. “पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण केले जाईल, तसेच शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पवना धरणातून ५२० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे आणण्याचे नियोजन आहे,” अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार उमा खापरे यांनी शहरातील १० महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्षवेधी मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
आमदार उमा खापरे यांनी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, “शहराची लोकसंख्या ४० लाखांवर पोहोचली असून ७५० एमएलडी पाण्याची गरज आहे, मात्र सध्या केवळ ६२० एमएलडी पाणी मिळत आहे. भामा आसखेड आणि पवना बंदिस्त जलवाहिनीचे प्रकल्प तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.”
अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार राहुल कुल यांचे प्रशासनाला आदेश
मेट्रो प्रकल्प: पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून जानेवारी २०२७ मध्ये ती प्रवाशांसाठी खुली केली जाईल.
पाणीपुरवठा: पवना धरणातून ५२० एमएलडी आणि आंध्रा धरणातून १०० एमएलडी असे एकूण ६२० एमएलडी अतिरिक्त पाणी शहरात आणण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
भामा आसखेड प्रकल्प: या प्रकल्पाचे काम संथगतीने करणाऱ्या ठेकेदाराला निलंबित करण्यात आले असून, आता कामाला गती दिली जाईल.
नदी सुधार: मुळा नदी सुधार योजनेचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून, पवना व इंद्रायणी नदी सुधारणेसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.
लक्षवेधी दरम्यान आमदार खापरे यांनी केवळ मेट्रो आणि पाणीच नव्हे, तर शहरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न, नवीन न्यायालय इमारत आणि वाढती वाहतूक कोंडी यांकडेही सरकारचे लक्ष वेधले. नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी ‘संयुक्त आराखडा’ तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही सरकारने यावेळी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो, पाणीपुरवठा आणि वाढती वाहतूक कोंडी या गंभीर प्रश्नांवर राज्य सरकारने विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पाचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.”
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीही सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पवना धरण येथून तब्बल ५२० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे शहरात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेत उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १० महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडली होती. यामध्ये मेट्रो, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मुद्द्यांचा समावेश होता.






