Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यात औरंगजेब समजून जाळला बहाद्दूर शाह जफरचा फोटो ; ‘पतित पावन’च्या आंदोलनात प्रकार

ण्यात (Pune) आज पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळण्यात आला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 16, 2025 | 07:56 PM
पुण्यात औरंगजेब समजून जाळला बहाद्दूर शाह जफरचा फोटो ; ‘पतित पावन’च्या आंदोलनात प्रकार

पुण्यात औरंगजेब समजून जाळला बहाद्दूर शाह जफरचा फोटो ; ‘पतित पावन’च्या आंदोलनात प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

लोकसभेत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी जोर धरुन लागली आहे. हिंदुत्त्ववादी संघटना यासाठी आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, सरकारकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.  औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मात्र, औरंगजेबाचाचे उदात्तीकरण नको असे म्हणत कबर हटविण्याच्या मागणीसाठी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. पुण्यात (Pune) आज पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळण्यात आला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

“पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अनेकजण यावरुन टीका करत आहेत. काहींनी आंदोलनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.

दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. आम्हाला औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, अस स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेने दिलं आहे. तसेच, आपल्याकडून अनावधानाने ही चूक झाल्याचंही आंदोलकांनी मान्य केलं आहे.

Web Title: Bahadur shah zafar photo burn instead of aurangzeb in pune patit pavan sanghatana protest in pune paurangzeb tomb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • Aurangzeb
  • Maharashtra Politics
  • pune news

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
4

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.