Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? तब्बल 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह

सार्वजनिक निधीतून लाखो रुपयांचा खर्च झाला असल्याने त्यातून विद्यार्थी, संशोधक आणि समाजाला नेमका काय लाभ झाला, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 03:37 PM
लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? तब्बल 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह

लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? तब्बल 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:

पुणे : सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांनी 8 ते 10 मे 2026 या कालावधीत लोणावळ्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुमारे 160 अधिकारी व समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेवर झालेल्या सुमारे 38 लाख 94 हजार 118 खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.  तसेच या तीन दिवसांच्या कार्यशाळेत कोणते धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, त्याचा अधिकृत अहवाल, निष्कर्ष किंवा कृती आराखडा सार्वजनिक करण्यात आला आहे का, याबाबतही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक निधीतून लाखो रुपयांचा खर्च झाला असल्याने त्यातून विद्यार्थी, संशोधक आणि समाजाला नेमका काय लाभ झाला, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.

यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, कार्यशाळा मे महिन्यात पार पडली असताना तिच्या खर्चास 22 जून 2026 रोजी झालेल्या बार्टीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची नोंद समोर आली आहे. खर्च झाल्यानंतर मंजुरी देण्यामागील प्रशासनिक कारण काय होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यशदासारख्या शासकीय प्रशिक्षण संस्थांची सुविधा उपलब्ध असताना कार्यशाळेसाठी पंचतारांकित हॉटेलची निवड का करण्यात आली, तसेच महत्त्वाच्या नियामक मंडळाच्या बैठका ऑनलाइन पद्धतीने घेणारे प्रशासन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मात्र आलिशान हॉटेलवर लाखो रुपये खर्च करण्यास प्राधान्य का देते, यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एकीकडे पीएचडी शिष्यवृत्तीच्या जागांमध्ये कपात, संशोधनासाठी निधीची कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा उल्लेख केला जात असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या कार्यशाळांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने निधीच्या प्राधान्यक्रमाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री, प्रधान सचिव, बार्टीचे प्रभारी महासंचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यशाळेची आवश्यकता, निविदा प्रक्रिया, खर्चाचे औचित्य, मंजुरीची प्रक्रिया आणि त्यातून साध्य झालेले परिणाम याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणातील सर्व कागदपत्रे, खर्चाचा तपशील आणि निर्णय प्रक्रियेची माहिती माहितीच्या अधिकारातून मागविण्यात येणार असल्याचे समजते.

या कार्यशाळेचे आयोजनाचे काम Pactic Media Concept Pvt. Ltd. या डीजीआयपीआर (DGIPR) पॅनेलवरील कंपनीला देण्यात आले होते. कंपनीचे संचालक निखिल प्रमोद करमपुरी असून, या कामासाठी निविदा प्रक्रिया, कंपनीची निवड आणि खर्चाचे औचित्य याबाबत पारदर्शकता  असणे आवश्यक  आहे. – ऍड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट्स हेल्पिंग हॅंडस.

हे सुद्धा वाचा : वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; टॉमटॉम संस्थेचा अहवाल जाहीर

Web Title: Bartis workshop held in lonavala is facing criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
2

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
3

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
4

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.