Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व; 13 जागांवर बिनविरोध निवड

पुणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपचे वर्चस्व दिसून आले. १५ प्रभाग समिती अध्यक्षपदांपैकी भाजपकडे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी १ अध्यक्षपद मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2026 | 11:38 AM
Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपचे वर्चस्व दिसून आले. १५ प्रभाग समिती अध्यक्षपदांपैकी भाजपकडे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी १ अध्यक्षपद मिळाले आहे. १३ ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहाप्रमाणेच प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महिलांचा आवाज घुमणार आहे.

 

मंगळवारी सकाळी मनपा भवन येथे पुण्याचे अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. ही निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांनी एकत्रित लढवली. नगररोड-वाघोली प्रभाग समितीत अनिल सातव (भाजप), छत्रपती शिवाजीनगर-घोले रोडमध्ये अमृता म्हेत्रे (भाजप), औंध-बाणेरमध्ये रोहिणी चिमटे (भाजप), कोथरूड-बावधनमध्ये वासंती काकडे (भाजप), वारजे-कर्वेनगरमध्ये मंजुषा खर्डेकर (भाजप), सिंहगड रोडमध्ये सचिन मोरे (भाजप), धनकवडी-कात्रज-आंबेगावमध्ये प्रतिभा चोरघे (भाजप), कोंढवा-उंड्रीमध्ये रंजना टिळेकर (भाजप), हडपसर-मांजरीमध्ये प्रशांत तुपे (भाजप), वानवडीमध्ये ॲड. साहिल केदारी (काँग्रेस), बिबवेवाडीमध्ये मनीषा चोरबेले (भाजप), कसबा पेठमध्ये उज्ज्वला यादव (भाजप) तसेच विश्रामबागवाडा प्रभाग समितीत राघवेंद्र मानकर (भाजप) यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली.

येरवडा-वडगावशेरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या कविता गलांडे यांनी काँग्रेसच्या विशाल मलके यांचा ८ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. तर ढोले पाटील रोड प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरेखा कवडे यांनी काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांचा ५ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला.

हे सुद्धा वाचा : जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?

बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश

बाणेर येथे उभारण्यात आलेले महापालिकेचे सुमारे ४० काेटी रुपयांचे रुग्णालय एका संस्थेला पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालविण्यास दिल्याचा आराेप नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी सर्वसाधारण सभेत केला. यानंतर नगरसेवकांनी आराेग्य सुविधांवर टिका केल्यानंतर महापाैर मंजुषा नागुपरे यांनी चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनानाला दिले आहेत. पुणे शहरात उभरण्यात आलेल्या खाजगी तसेच पीपीपी तत्ववारील रुग्णालयात नागरिकांची मोठी फसवणूक केली जात आहे. नगरसेवक बालवडकर यांनी बाणेर येथील रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विराेधी पक्षनेते निलेश निकम, अजय खेडेकेर, अर्चना पाटील ,वैशाली भालेराव, सचिन दाेडके, माजी महापाैर दत्ता धनकवडे आदींनी आराेग्य विभागाच्या कारभारावर टिका केली.

Web Title: Bjp has won more seats in the pune municipal corporation ward committee chairmanship elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.