Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती’; युवक काँग्रेसचा घणाघात

भाजपच्या नेत्यांनी इतर पक्षातील नेत्यांबाबत बोलताना तोंड सांभाळून आणि भान ठेवून बोललं पाहिजे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती चढली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2024 | 01:06 PM
'भाजप नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा...; युवक काँग्रेसचा इशारा

'भाजप नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा...; युवक काँग्रेसचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : सांगलीतील जत येथे महायुतीच्या प्रचारसभेत भाजप नेते व आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध केला जात आहे.

हेदेखील वाचा : ‘हौज खास येथील छठ उत्सव रोखण्यासाठी भाजपकडून पोलिस आणि डीडीएचा वापर’; आम आदमी पक्षाचा आरोप

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खोत यांना खडेबोल सुनावले असून, टीका करताना भान ठेवून बोलावे, असा इशारा देखील दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून खोत यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “भाजपच्या नेत्यांनी इतर पक्षातील नेत्यांबाबत बोलताना तोंड सांभाळून आणि भान ठेवून बोललं पाहिजे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती चढली आहे. सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत पातळी सोडून केलेली टीका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. महाराष्ट्राच्या जनतेला खोत यांची भाषा अजिबात आवडलेली नसून विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला याची मोठी किंमत मोजावी लागेल. जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.“

इथून पुढे महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याबाबत जर भाजपचा कोणताही नेता पातळी सोडून, बेतालपणे वक्तव्य करेल तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल. वाचाळवीरांना भाजप नेत्यांनी नीट समज द्यावी अन्यथा त्यांचे फिरणे मुश्किल करू, असा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

सांगलीतील प्रचारसभेमध्ये भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी भाषणावेळी वादग्रस्त विधान केले होते. ‘अरे पवारसाहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या’, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यामुळे राजकारण तापले होते.

हेदेखील वाचा : आज्जी जोमात पाहणारे कोमात! फटाक्यांची पेटती माळ हातात मिरवत आज्जींनी संपूर्ण रस्त्यावर नाचवली, Video Viral

Web Title: Bjp leaders should keep their mouths shut warning of youth congress nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
1

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
3

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल
4

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.