Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींना मिळणार 5 हजारांचा बोनस? महिला व बालविकास विभागाने स्पष्टच सांगितलं

राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, मात्र जिल्ह्यातील हजारो महिला अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 22, 2024 | 02:22 PM
लाडक्या बहिणींना मिळणार 5 हजारांचा बोनस? महिला व बालविकास विभागाने स्पष्टच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दिवाळीच्या मुहूर्तावर 5 हजार रुपयांचा बोनस मिळाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे राज्यभरातील अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. यावर राज्य सरकारच्या  महिला व बालविकास विभागाने  स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर या योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचा बोनस मिळत असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. यात या योजनेशी संबंधित अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत, जसे की अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे, लाभार्थी महिलांना दिवाळीला 5,000 रुपयांचा बोनस मिळेल आणि त्यांचे बँक खाते तपासले जाईल, असे सांगितले जात आहे.

हेही वाचा: भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत, कुडाळच्या जागेवर धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा लढविणार?

पण या दाव्यांमध्ये तथ्य नसून या संदर्भात विभागाकडून कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर महिलांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाने दिले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, मात्र जिल्ह्यातील हजारो महिला अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना अर्ज करता आला नाही. याशिवाय आचारसंहिता लागू झाल्याने अर्ज प्रक्रिया अचानक ठप्प झाल्याने जिल्ह्यातील हजारो महिलांमध्ये संभ्रम व चिंतेचे वातावरण आहे.

योजनेला तात्पुरती स्थगिती

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांना स्थगिती देणारी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद करण्याचे आदेश आयोगाने सरकारला दिल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी सांगितले. त्यामुळे महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: आदित्य ठाकरेंसाठी शिंदे-भाजपचा मेगा प्लॅन; शिंदे कुटुंबाला मिळणार उमेदवारी?

अफवांवर विश्वास ठेवू नका

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेशी संबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत शासनस्तरावर कोणताही अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या दाव्यांमध्ये तथ्य नाही. महिलांनी या अफवांकडे लक्ष देऊ नये आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर विश्वास ठेवू नये अशी विनंती केली जाते. सरकारी योजनांची माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच मिळवा.

Web Title: Bonus of 5000 will be given under ladaki bahina yojana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 02:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Baheen Yojna
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti Governmet

संबंधित बातम्या

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
1

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
2

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत
3

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.