Photo Credit- Team Navrashtra (वरळीत आदित्य ठाकरेंचा पराभव करण्यासाठी शिंदे-भाजपचा मेगा प्लॅन)
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत यावेळी अटीतटीची लढाई होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी ही लढाई प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. भाजपने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील मतभेद दूर होऊन आज दुपारी किंवा रात्री पर्यंत त्यांच्या उमेदवारांचीही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळीत शिंदे गट आणि भाजपकडून मोठी फिल्डींग लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, वरळी विधानसभा मतदारसंघात आगित्या ठाकरे यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने रणनीनी आखण्यास सुरूवात केली आहे. वरळी विधासभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून त्यांचा पराभव करू शकेल, अशा उमेदवाराची चाचपणी दोन्ही पक्षांकडू सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या महितीनुसार, वरळीतून भाजपच्या शायना एन.सी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: नारायण राणे यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याची खासदारकी धोक्यात?; निवडणूक आयोगाकडे याचिकेद्वारे आव्हान
याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरू आहे.त्यामुळे वरळीतून महायुतीकडून कोणता उमेदवार उतरवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या जागावाटपातील सुत्रानुसार,वरळी विधासभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाणार आहे.
त्यामुळे शायना, एन.सी यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अगदीच गरज भासल्यास वरळीतून एकनाथ शिंदे यांच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला याठिकाणी मैदानात उतरवले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकी वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार
त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हेही वरळीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे गट मनसेची मदत घेणार की मनसेला डावलून याठिकाणी महायुती आपला उमेदवार देणार, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.