Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ShaniwarWada: मोठी बातमी! ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण; तीन महिलांवर गुन्हा दाखल

शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारकात आहे. या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घडली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2025 | 06:17 PM
शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं

शनिवारवाड्यातील नमाज पठाणावरुन पुण्यातील राजकारण तापलं

Follow Us
Close
Follow Us:
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याने पुण्यातील वातावरण तापले
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल

पुणे:

शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तीन अनोळखी महिलांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याने पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारकात आहे. या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घडली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) उशिरा याबाबत तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरण पोलिसांकडून प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्मारके आणि अवशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
ऐन दिवाळीत शनिवारवाड्याच्या आवारात महिलांनी नमाज पठण केल्याची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात रविवारी आंदोलन केले. शनिवारवाड्याच्या परिसरात कार्यकर्त्यांनी शिववंदना केली.
’शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य तसेच पेशव्यांनी दाखविलेल्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात सर्व जातीधर्माचे बांधव गुण्यागोविंद्याने राहतात. मेधा कुलकर्णी खासदार आहेत. याचा विसर त्यांना पडला आहे. कोथरूडनंतर त्या कसब्यात येऊन हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. या प्रकरणी कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

शनिवार वाडा नमाज पठणावरून रुपाली ठोंबरें मेधा कुलकर्णींवर संतापल्या
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मेधा कुलकर्णी सातत्यांने पुण्यातील शांतता आणि ऐक्य धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्या खासदार आहेत हे त्या विसरल्या आहेत. पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम मेधा कुलकर्णी सातत्याने करत आहेत. कोथरूडमध्ये नाटकं केली, आता कसब्यातून पुन्हा वातावरण पेटवण्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Muhurat Trading: मुहूर्त ट्रेडिंगचे काउंटडाउन झाले सुरू, सामान्य गुंतवणूकदारासाठी कसे असते हे ट्रेडिंग सत्र? जाणून घ्या

शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले, “शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही. तो मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा आणि सर्व पुणेकरांचा आहे. खासदार बाईंनी केलेल्या कृत्यामुळे पुण्यातील सौहार्द धोक्यात येत आहे. त्यांनी शनिवारवाड्यात केलेल्या नाटकावर तातडीने गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजपनेही त्यांना आवर घालावा.”

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी पुण्यातील धार्मिक वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अशा कृत्यांना आळा घालणे गरजेचे आहे. प्रार्थना असो किंवा दुवा — श्रद्धा एकच असते, हे त्या विसरल्या आहेत.” अशी टिका रुपाली पाटील यांनी केली आहे.

Web Title: Case registered against three women for namaz pathan at shaniwarwada pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • crime news
  • Medha Kulkarni
  • Pune

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.