Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात; CCPAकडून कडक सूचना

काही उपाहारगृह चालक ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारत आहेत, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची दखल घेत सीसीपीए उपाहारगृह चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2026 | 01:40 PM
हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात; CCPAकडून कडक सूचना
Follow Us
Follow Us:

पुणे : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) पुण्यासह राज्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहांना सूचना दिल्या आहेत. ग्राहकांकडून ‘गॅस अधिभार’ किंवा याप्रकारच्या कोणत्याही कारणांखाली अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रकारांना स्पष्ट मनाई केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी देशभरातून प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाने याबाबत कडक भूमिका घेत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही उपाहारगृह चालकांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी या अतिरिक्त आकारणीचा उल्लेख थेट बिलामध्येही केल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेत सीसीपीए उपाहारगृह चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

 

अमेरिका-इराण व इस्राईल यांच्यातील युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. याचा गैरफायदा घेत काही उपाहारगृह चालकांनी ग्राहकांकडून जादा पैसे आकारण्यास सुरुवात केली. काही उपाहारगृह चालकांनी याबाबतचा उल्लेख बिलात केला आहे. छापील बिलात गॅस टंचाईचे अतिरिक्त पैसे आकारल्याचे नमूद केल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

…अन्यथा अनुचित व्यापार पद्धती मानली जाईल

‘सीसीपीए’कडून मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या असून, कोणत्याही उपाहारगृहचालकांनी (हॉटेल, रेस्टॉरंट, बार) गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे घेऊ नये. उपाहारगृहाच्या मेन्यू कार्डमध्ये असा उल्लेख करणेही अनुचित व्यापार पद्धती मानली जाईल, अशा सूचना सीसीपीएने देशभरातील उपाहारगृह चालकांना दिल्या आहेत.

आदेशातील महत्त्वाचे मुद्दे

  • अतिरिक्त शुल्क आकारणे ही अनुचित व्यापार पद्धती ठरू शकते
  • गॅस टंचाईचा आधार घेत ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे ग्राह्य धरले जाणार नाही
  • उपाहारगृहांनी आपल्या खर्च व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतः घ्यावी
  • बिलिंग प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखणे बंधनकारक
  • ग्राहकांना आकारण्यात येणाऱ्या किमती स्पष्ट, पूर्वनिर्धारित आणि मेनूमध्ये दर्शविलेल्या असाव्यात
  • कोणत्याही प्रकारचे लपविलेले शुल्क, अधिभार किंवा स्वतंत्र आकारणी टाळावी
गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे आकारणे ही अनुचित व्यापार पद्धती आहे. गॅस टंचाईचे कारण सांगून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा घेणे हे ग्राहक हिताच्या विरोधी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशातील उपाहारगृह चालकांना दिलेल्या सूचना, तसेच निर्णय हा स्वागतार्ह आहे.– ॲड. ज्ञानराज संत, पुणे जिल्हा कन्झ्युमर ॲडव्होकेटस् असोसिएशन, उपाध्यक्ष

हे सुद्धा वाचा : डिजिटल युगात वाचन संस्कृतीसमोर मोठे आव्हान; मोबाईल-आधारित माहितीमुळे सखोल वाचन घटले

Web Title: Ccpa has issued important instructions to hotel owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Gas Cylinder
  • hotel
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.