Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale on Raj Thackeray: रामदास आठवलेंचे ठाकरेंबद्दल मोठे विधान; म्हणाले, “… त्यांना काय मिळणार?”

राज्यघटना बदलणार ही अफवा होती, हे लोकांच्या लक्षात आले आहे. विधानसभेला लाडकी बहिणीनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्याचाही फायदा महायुतीला झाला, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2025 | 01:49 PM
Ramdas Athawale on Raj Thackeray: रामदास आठवलेंचे ठाकरेंबद्दल मोठे विधान; म्हणाले, "... त्यांना काय मिळणार?"

Ramdas Athawale on Raj Thackeray: रामदास आठवलेंचे ठाकरेंबद्दल मोठे विधान; म्हणाले, "... त्यांना काय मिळणार?"

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात 25 तारखेला यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. तयावर आता महयुतीमधील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची भेट होणे हे ठीक आहे मात्र ते महायुतीत आल्यास त्यांचा महायुतीला काही फायदा होणार नाही. आत्ता आम्हालाच सत्तेत हिस्सा मिळत नाहीत , तर ठाकरे आल्यावर त्यांना काय मिळणार? असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, “अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढल्या जात नाहीत. महाविकास आघाडीही एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता नाही. पण, महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसावे. महायुतीने लोकसभा, विधानसभेला रिपाईंला डावलले असले तरी मी त्यांना डावलणार नाही. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला डावलले जाणार नाही,” अशी खात्री आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली आहे.

‘राज्यघटना बदलणार ही अफवा होती, हे लोकांच्या लक्षात आले आहे. विधानसभेला लाडकी बहिणीनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्याचाही फायदा महायुतीला झाला. दलित मतदार महायुतीच्या पाठीशी राहिला. अपेक्षेपेक्षा जास्त आमदार निवडून आले. मतदान यंत्रात दोष नाही. तर, महाविकास आघाडी दोषी आहे. ते हवेत राहिले आणि आम्ही जमिनीवर राहिलो. त्यामुळे महायुतीचा विजय झाला. निकषात बसणा-या लाडक्या बहिणीना अपात्र केले जाणार नाही,” असेही ते म्हणाले.

रामदास आठवले पुढे म्हणाले, “पुणे, मुंबई, ठाणे या मोठ्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गरिबांना पक्की घरे मिळत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सुरुवातीला १८० चौरस फूट जागेची घरे मिळत होती. त्यानंतर २४५ आणि आता ३०० चौरस फुटाची घरे मिळत आहेत.आम्ही राज्य शासनाकडे कमीत ४५० चौरस फुटाची घरे असावीत, असा प्रस्ताव दिला आहे’.

हेही वाचा: Ramdas Athawale On Love Jihad Law: ‘लव्ह जिहाद’वरून महायुतीत वाद? आठवलेंचा विरोध; म्हणाले, “यास माझी सहमती नाही मात्र…”

सूर्यवंशीला न्याय मिळण्यात उशीर होतोय

सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी कारवाई व्हावी परभणीतील राज्यघटना विटंबना विरोधी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळायला उशीर होत आहे. जबाबदार पोलिसांवर तातडीने कारवाई होणे गरजेची आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.  मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही आठवले म्हणाले.

Web Title: Central minister ramdas athwale statement on raj thackeray mahayuti local body elections marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Pimpri
  • Raj thakcreay
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
1

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले
2

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

Nagpur Politics: महायुती तुटली; मविआ फुटली नागपुरात शिंदेसेना स्वबळावर, तर भाजपचे ‘वेट अॅण्ड वॉच’
3

Nagpur Politics: महायुती तुटली; मविआ फुटली नागपुरात शिंदेसेना स्वबळावर, तर भाजपचे ‘वेट अॅण्ड वॉच’

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
4

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.