Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramdas Athawale: महायुतीत रामदास आठवले आक्रमक! ‘आम्हालाही सत्तेत वाटा द्या’; मित्रपक्षांकडे केली मोठी मागणी

Ramdas Athawale: महायुतीतील सत्तावाटपावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील सत्तेत RPIला योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका मांडत त्यांनी दोन महामंडळे आणि एक आमदारकी देण्याची मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 02, 2026 | 04:36 PM
महायुतीत रामदास आठवले आक्रमक! ‘आम्हालाही सत्तेत वाटा द्या’; मित्रपक्षांकडे केली मोठी मागणी

महायुतीत रामदास आठवले आक्रमक! ‘आम्हालाही सत्तेत वाटा द्या’; मित्रपक्षांकडे केली मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • महायुतीत रामदास आठवले आक्रमक!
  • ‘आम्हालाही सत्तेत वाटा द्या’
  • भाजप अन् मित्रपक्षांवर व्यक्त केली उघड नाराजी
पोपट पिटेकर,अहिल्यानगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील आरपीआयच्या दुर्लक्षावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही गेल्या १४ वर्षांपासून भाजप-शिवसेनेसोबत आहोत, मात्र तरीही महाराष्ट्राच्या सत्तेत आमच्या पक्षाला हवा तसा वाटा मिळत नाही, अशा शब्दांत आठवलेंनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. (Ramdas Athawale)

आरपीआयला महायुतीत गृहीत धरू नका

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “मला केंद्रात मंत्रिपद मिळाले ही वेगळी गोष्ट आहे, पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्री केले, त्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही महाराष्ट्रात सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आम्हाला सोबत नक्कीच मिळाली होती, परंतु सध्याच्या काळात मित्रपक्ष म्हणून आम्हाला गृहीत धरलं जात आहे. भाजप आणि शिवसेनेसोबत असूनही पक्षाला एकही मंत्रिपद महाराष्ट्रात मिळालेले नाही.

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख मागण्या

विधानपरिषदेवर एक जागा: राज्यपाल नियुक्त ५ रिक्त जागांपैकी १ आमदारकी आरपीआयला मिळावी.

दोन महामंडळांचे अध्यक्षपद:  आरपीआयला किमान दोन राज्यस्तरीय महामंडळांचे अध्यक्षपद आणि कार्यकर्त्यांसाठी ४० ते ५० सदस्यपदे मिळावीत.

स्थानिक समित्यांमध्ये वाटा: प्रत्येक जिल्ह्यात डीपीडीसी (DPDC) समित्या, तालुका समित्या आणि ‘एसओ’मध्ये कार्यकर्त्यांना संधी द्यावी. यासाठी पालकमंत्र्यांना स्पष्ट आदेश दिले जावेत.

आम्ही भाजपच्या कोट्यात नाही, महायुतीचे स्वतंत्र घटक!

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर बोलताना आठवले म्हणाले, आम्ही केवळ भाजपच्या कोट्यात आहोत असे समजणे चुकीचे आहे. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा एक स्वतंत्र आणि महत्त्वाचा घटक पक्ष आहे.” २०१२ मधील बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीला उजाळा देत आठवले म्हणाले, “शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रात मोठे सामाजिक परिवर्तन घडेल, असा विश्वास बाळासाहेबांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आमचा सन्मान झालाच पाहिजे.

प्रभाग पद्धतीला विरोध; ‘वॉर्ड सिस्टीम’ पुन्हा आणण्याची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, चार-चार वॉर्डांच्या प्रभाग पद्धतीमुळे छोट्या पक्षांचे मोठे नुकसान होत असून कार्यकर्त्यांना स्वतःच्या बळावर निवडून येणे कठीण जात आहे. “मोठ्या पक्षांसाठी ही पद्धत ठीक असेल, पण छोट्या पक्षांचा विचार करून पूर्वीसारखी ‘एकल वॉर्ड पद्धती’ पुन्हा लागू करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न

देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पक्षाची शाखा पसरली असून नागालँड आणि मणिपूरमध्ये आरपीआय मान्यताप्राप्त पक्ष आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास निवडणूक आयोगाकडून आरपीआयला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या महायुतीत जागावाटप आणि सत्तेच्या वाटपावरून चर्चा रंगलेली असतानाच, रामदास आठवले यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील प्रमुख पक्षांवर आरपीआयला सत्तेत वाटा देण्यासाठी मोठा राजकीय दबाव निर्माण झाला आहे.

Abhijeet Dipke Viral Video: ‘चला, चहा घेऊ…’ म्हणत मुंबई पोलिस दिपकेंना घेऊन गेले; CJP आंदोलनापूर्वीचा मजेशीर VIDEO चर्चेत

Web Title: Ramdas athawale expresses displeasure in mahayuti demands share in power for rpi sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Mahayuti
  • Ramdas Athawale
  • RPI

संबंधित बातम्या

Amravati MLC Election 2026: महायुतीत बंडाचा झेंडा! अमरावती शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडेंचे दोन अर्ज; ‘तिकीट न मिळालं…’
1

Amravati MLC Election 2026: महायुतीत बंडाचा झेंडा! अमरावती शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडेंचे दोन अर्ज; ‘तिकीट न मिळालं…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.