Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!

Chitra Mandai Pune: पुण्यात १ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ 'चित्र मंडई' राष्ट्रीय कला उत्सव भरणार आहे. कलाकारांसाठी विनामूल्य नोंदणीची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 23, 2026 | 05:33 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात प्रथमच ‘चित्र मंडई’चे प्रदर्शन
  •  कलाकारांना कलाविष्कार, तसेच आर्थिक स्वावलंबनाची संधी
  • नोंदणीची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत
Chitra Mandai Pune 2026: भारतीय पारंपरिक कला, लोककला आणि आधुनिक कलाप्रकारांचे जतन, संवर्धन व पुनरुज्जीवन करण्यासोबतच कलाकारांना त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी, थेट विक्रीसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘चित्र मंडई २०२६’ या राष्ट्रीय कला, संस्कृती स्वावलंबन उत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथील सामवेद कला, संगीत, दृश्यीकरण, मनोरंजन व अभिकल्प विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान पथ, जंगली महाराज रस्ता येथे हा उत्सव होणार आहे.

या उत्सवात चित्रकला, लोककला, पारंपरिक कला, शिल्पकला, कुंभारकला, हस्तकला तसेच आधुनिक व संगणकीय कलाप्रकारांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष कलानिर्मिती, कलाप्रात्यक्षिके, कलाकारांशी संवाद आणि कला व्यवसायविषयक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांची मेजवानी कलारसिकांना अनुभवता येणार आहे.

कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुण दिले

कलाकारांना आपल्या कलाकृती सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना बाजारपेठ मिळवून देणे, कलेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि कलाकारांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास प्रोत्साहन देणे, हा या उत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे चित्रकार, हस्तकलाकार, पारंपरिक कलावंत तसेच आधुनिक कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांसाठी हा उत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे आणि सामवेदचे अधिष्ठाता डॉ. ए. डी. काटे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?

नोंदणीची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत

या उत्सवात सहभागी होण्यासाठी कलाकारांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी विनामूल्य असून, ३० ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. सहभागी कलाकारांना प्रदर्शनासाठी जागा, उपलब्धतेनुसार मेज व खुर्ची, पिण्याचे पाणी, चहा व अल्पोपाहार, सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रचार-प्रसाराद्वारे प्रसिद्धी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहिती व नोंदणीसाठी ९७६६९ ३७९५६, ९९६०७ ३९४६७ या भ्रमणध्वनीवर संपर्क करता येईल.

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'चित्र मंडई २०२६' उत्सवाचे आयोजन कुठे आणि कधी होणार आहे?

    Ans: हा उत्सव रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत छत्रपती संभाजी महाराज उद्यान पथ, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे होईल.

  • Que: या उत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: सहभागी होण्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम तारीख असून नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे.

  • Que: या उत्सवाचे आयोजन कोणाद्वारे करण्यात आले आहे?

    Ans: जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या सामवेद विभागाने पुणे महानगरपालिका (PMC) यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन केले आहे.

Web Title: Chitra mandai 2026 pune art festival registration marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • art festival
  • Maharashtra. Pune

संबंधित बातम्या

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?
1

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
2

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

कला-संस्कृतीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; आरे कॉलनीतील ‘ओम आर्ट सेंटर’ला सर्वतोपरी सहकार्य, सुनेत्रा पवारांचे आश्वासन
3

कला-संस्कृतीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; आरे कॉलनीतील ‘ओम आर्ट सेंटर’ला सर्वतोपरी सहकार्य, सुनेत्रा पवारांचे आश्वासन

कुणीतरी आले गं! Pune शहरात घुमणार वाघांची डरकाळी; नागपूरवरून आले नवे पाहुणे, मात्र…
4

कुणीतरी आले गं! Pune शहरात घुमणार वाघांची डरकाळी; नागपूरवरून आले नवे पाहुणे, मात्र…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.