Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कला-संस्कृतीच्या विकासासाठी शासन कटिबद्ध; आरे कॉलनीतील ‘ओम आर्ट सेंटर’ला सर्वतोपरी सहकार्य, सुनेत्रा पवारांचे आश्वासन

Sunetra Pawar on Om The Global Art Centre Aarey Museum: आरे कॉलनीतील ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 22, 2026 | 09:46 PM
Sunetra Pawar on Om The Global Art Centre

Sunetra Pawar on Om The Global Art Centre

Follow Us
Follow Us:
  • आरे कॉलनीत उभे राहणार कलेचे नवे दालन
  • ‘ओम आर्ट सेंटर’ला शासनाचे पाठबळ
  • २१ चित्रकार-शिल्पकारांचा सन्मान
कलाकार, कला, आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आरे कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis : जलप्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय? जलप्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

आरे कॉलनी येथील निसर्गरम्य परिसरात आयोजित ‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार रवींद्र वायकर, वित्त विभागाचे सहसचिव संजय इंगळे, आरे मिल्क कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर, ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र बोरलेपवार, मयुरी बोरलेपवार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राला अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून वारली चित्रकलेपर्यंत आणि आधुनिक चित्रकला व शिल्पकलेपर्यंत समृद्ध कलापरंपरा लाभली आहे. कला ही केवळ सौंदर्याची अनुभूती देणारी नसून ती माणसाला विचार करायला शिकवते, संवेदनशील बनवते आणि समाजाला एकत्र जोडते.

‘ओम’ या केंद्राच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांना प्रदर्शनासोबतच एकत्र राहून कलानिर्मिती करणे, नवनवीन प्रयोग करणे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होत आहे. ‘शिल्परंग’सारख्या उपक्रमांमुळे विविध राज्यांतील कलाकार एकत्र येऊन भारतीय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतात. युवा कलाकारांनी आपल्या कलेवर विश्वास ठेवून नवनवीन प्रयोग करावेत. तसेच आपल्या मातीशी नाते जपत जागतिक विचारांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कला क्षेत्रातील महिलांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, अधिकाधिक मुलींना कलाशिक्षण, कलानिर्मिती आणि व्यावसायिक संधी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. कला क्षेत्राला राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासोबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. दृश्य कला (व्हिज्युअल आर्ट्स) हा विषय सांस्कृतिक कार्य विभागाकडे वर्ग करण्याबाबतही सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दृश्य कलांना व्यापक व्यासपीठ देण्याची गरज- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राजाश्रय वाढविण्यासह त्यांच्या संकल्पनांना भक्कम पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. भारतीय चित्रकला आणि शिल्पकलेला समृद्ध परंपरा लाभली आहे. याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कला क्षेत्र , शासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. दृश्य कला आणि सादरीकरण कला या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विचार करून दृश्य कलांना अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ येथे साकारलेल्या शिल्पांमध्ये केवळ मूर्त स्वरूप नसून त्यामागे भावनिक, संवेदनशील आणि नैसर्गिक आशय दडलेला आहे. कलाकृतीचे सौंदर्य अनुभवण्याबरोबरच त्यामागील विचार, भावना आणि तत्त्वज्ञान समजून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी रंगांच्या माध्यमातून व्यापक विचार मांडण्याची परंपरा जपली आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय जीवनपद्धती, अध्यात्म आणि संस्कृतीमध्ये रंगांना विशेष महत्त्व आहे. रंगसंगतीचा संबंध मानवी भावना, संवेदना आणि तत्त्वज्ञानाशी आहे. चित्रकारांनी आपल्या कलाकृतींतून भारतीय परंपरा, विचार आणि जीवनदृष्टी प्रभावीपणे मांडावी. शिल्पकलेने लेणी, वास्तू आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीला आकार दिला असून, या परंपरेशी नव्या पिढीचे नाते जोडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत, असेही मंत्री शेलार यांनी नमूद केले.

२१ चित्रकार व शिल्पकारांचा सन्मान

‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादात देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या २१ चित्रकार व शिल्पकारांचा शाल आणि प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये विनोद शर्मा, सुहास बहुलकर, चरण शर्मा, जॉन डगलस, निलेश वेडे, प्रदीप जोगदंड, रमेश चंद्र, साक्षी कदम, आनंद पांचाळ, सिद्धार्थ शिंगाडे, नितीन मिस्त्री, अमरनाथ शर्मा, प्रदीप कामिया, नीना देवांगन, वैभव मोरे, जगन्नाथ महापात्रा, दिलीप शर्मा, योगेश मुरकुटे, मान काफर, रविकुमार आणि केतन खुटले यांचा समावेश होता.

यावेळी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी साकारलेल्या शिल्पांची पाहणी करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.

MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा

Web Title: Sunetra pawar ashish shelar at om global art centre aarey museum aarey colony pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • Ashish Shelar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Ashish Shelar : जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंतांच्या दाव्यानंतर आशिष शेलार मैदानात
1

Ashish Shelar : जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंतांच्या दाव्यानंतर आशिष शेलार मैदानात

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
2

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
3

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
4

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.