Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरपोच सेवेचा दावा फोल? गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा

घरपोच सेवा देत असल्याचा दावा करणाऱ्या लोणी काळभोर गॅस एजन्सीसमोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 02:37 PM
घरपोच सेवेचा दावा फोल? गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा

घरपोच सेवेचा दावा फोल? गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा

Follow Us
Follow Us:
  • घरपोच सेवेचा दावा फोल?
  • गॅस सिलेंडरसाठी लांबलचक रांगा
  • एजन्सीसमोर नागरिकांचा संताप
कदमवाकवस्ती : घरपोच सेवा देत असल्याचा दावा करणाऱ्या लोणी काळभोर गॅस एजन्सीसमोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरपोच सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात मागील काही दिवसांपासून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अनेकांना एजन्सीसमोर प्रत्यक्ष जाऊन सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. काही नागरिकांच्या मते, अनेक वेळा तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही या टंचाईची चर्चा सुरू आहे. विशेषतः इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. याचा परिणाम घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर झाल्याचे बोलले जात आहे. गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, सिलेंडर पुरवठा सुरळीत नसल्याने परिसरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी घरगुती तसेच व्यावसायिक सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याची चर्चा असून, दुप्पट पैसे घेऊन गुप्तपणे सिलेंडर विक्री होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा : मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकलंय, मग फक्त ‘LPG’वरच संकट, पेट्रोल-डिझेलवर परिणाम का नाही?

या संदर्भात एजन्सीचे संचालक राहुल क्षीरसागर यांनी सांगितले की, गॅसचा नियमित पुरवठा सुरू आहे. जेवढी बुकिंग होते तेवढ्याच प्रमाणात सिलेंडरचा सप्लाय केला जात आहे. गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांची मुदत असून सिलेंडर घेण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. एजन्सी कार्यालयाजवळ नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे काही वेळा घरपोच वितरणावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लोकांची झुंबड! या अ‍ॅपने ChatGPT ला टाकले मागे, डाउनलोडमध्ये ठरला नंबर 1

Web Title: Citizens are lining up in front of gas agencies to buy gas cylinders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • lpg cylinder
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.