Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख आणि बीडमधील बडे नेते शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी जीवन संपवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2026 | 12:01 PM
बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Follow Us
Follow Us:
  • शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या
  • बीडसह राज्यभरात मोठी खळबळ
  • 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख आणि बीडमधील बडे नेते शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी जीवन संपवले आहे. या घटनेमुळे बीड आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे.

मे महिन्यात झाला होता प्राणघातक हल्ला

मे 2026 मध्ये परळी शहरात त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने (कोयत्याने) जीवघेणा हल्ला केला होता. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. शिवाजी शिंदे हे आपल्या हॉटेलमध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या एका युवकाने हातात कोयता घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. याच घटनेत शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील इतर लोकांनी या युवकाला पकडून ठेवल्याने शिंदे यांचा जीव थोडक्यात वाचला होता. या हल्ल्यात शिवाजीराव शिंदे यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर शिवाजी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरवसे नावाचा मुलगा आहे. त्याची माझी ओळख देखील नाही. मात्र, त्याचा आणि माझ्या मुलाचा काहीतरी वाद झाल्याचे समजले. त्याने माझ्या घरासमोर येऊन सर्वांदेखत शिवीगाळ केली. माझ्या हातापायावर अनेक वार करण्यात आले आहेत. माझ्या हॉटेलमधील पैसे लुटण्यात आले, असा आरोप त्यावेळी शिवाजीराव शिंदे यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

त्यामुळे या घटनेचा आणि शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे.  आता पोलीस तपासात शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येबाबत कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या एका राजकीय नेत्याने अचानक अशा प्रकारे जीवन संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. बीड पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत असून, आत्महत्येचे गूढ पोलीस तपासाअंतीच उलगडणार आहे.

 

Web Title: An incident has occurred in which shivajirao shinde a leader of the shinde faction has committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Beed News
  • CM Devedra Fadnavis
  • suicide news

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
4

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.