Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belhe Bus Stand : बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी असलेले बेल्हे बसस्थानक सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील बसस्थानक वाहतूक नियंत्रक कक्ष गेल्या ६ ते ७ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2026 | 05:29 PM
बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

बेल्हे बसस्थानक नियंत्रकांच्या प्रतीक्षेत! सात वर्षांपासून वाहतूक नियंत्रक कक्ष कुलूपबंद

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी असलेले बेल्हे बसस्थानक सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील बसस्थानक वाहतूक नियंत्रक कक्ष गेल्या ६ ते ७ वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाढती प्रवासी संख्या आणि शैक्षणिक संस्थांच्या पार्श्वभूमीवर हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे असतानाही एसटी महामंडळाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

बेल्हे परिसरातून अहिल्यानगर, कल्याण, पारनेर, सुपा तसेच पंचक्रोशीतील विविध गावांकडे जाण्यासाठी दररोज शेकडो नागरिक एसटी बससेवेचा आधार घेतात. मात्र, प्रत्यक्ष बसस्थानकावरील नियंत्रक कक्षच बंद असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या बसची वेळ, उपलब्ध मार्ग आणि फेऱ्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळत नाही. परिणामी नागरिकांना तासन्‌तास स्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पासची समस्या

परिसरात नामवंत महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था असल्याने शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी असते. वाहतूक नियंत्रक कक्ष बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मासिक बस पास काढणे, त्याचे नूतनीकरण करणे किंवा शैक्षणिक सवलतीच्या योजनांची माहिती मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. नियंत्रक कक्ष सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकतात.

बसेस बाह्यमार्गाने; प्रवाशांची गैरसोय

वाहतूक नियंत्रक नसल्याने स्थानकात येणाऱ्या एसटी बसेसची कोणतीही अधिकृत नोंद ठेवली जात नाही. याचाच गैरफायदा घेत अनेक चालक व वाहक बसेस बेल्हे बसस्थानकात न आणता परस्पर बाह्यमार्गावरून (बायपास) घेऊन जातात. यामुळे स्थानकात ताटकळत थांबलेल्या प्रवाशांना बस वेळेवर मिळत नाही, तसेच अनेकदा रात्रीच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होतात.

हे सुद्धा वाचा : हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

‘नियंत्रक कक्ष आहे, पण सुविधा कुठे?’

एकीकडे एसटी महामंडळ आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी उत्पन्नवाढीचे नवनवीन उपाय शोधत असताना, दुसरीकडे भरपूर प्रवासी क्षमता असलेले बेल्हे बसस्थानक मात्र वर्षानुवर्षे वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा व तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘बसस्थानक नियंत्रक कक्ष आहे, पण सुविधा कुठे?’ असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत.

विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, पासची गैरसोय आणि बसेसची विस्कळीत झालेली वाहतूक त्वरित सुरळीत करण्यासाठी बेल्हे येथील बंद पडलेला वाहतूक नियंत्रक कक्ष तातडीने सुरू करून तिथे कायमस्वरूपी पूर्णवेळ वाहतूक नियंत्रकाची (टीआय) नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

Web Title: Citizens are raising issues regarding the belhe bus station due to the administrations neglect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Bus Stand
  • Pratap Saranaik
  • st bus

संबंधित बातम्या

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
1

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
2

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
3

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
4

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.