बस फिरवणे, मागे-पुढे घेणे यावेळी चिखलात वाहन अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांनाही बसमध्ये चढणे-उतरणे यात विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती आधीच बिकट आहे.
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, एसटी बसस्थानके महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.