हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; 'डी-१५ ब्लॉक'चा पहिला टप्पा यशस्वी!
ब्लॉकदरम्यान दोन्ही क्रॉसओव्हर पॉइंट यशस्वीपणे काढण्यात आले. त्यानंतर संबंधित मार्गिकेचा भाग ‘प्लेन ट्रॅक’मध्ये रूपांतरित करण्यात आला. या कामात सहा ग्लूड जॉइंट बसविण्यासह ६० किलो वजनाच्या रेल्वे रुळांवरील चार वेल्डिंगची कामेही पूर्ण करण्यात आली.
Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
सिग्नलिंग आणि दूरसंचार विभागाशी संबंधित आवश्यक कामेदेखील नियोजनानुसार करण्यात आली. क्रॉसओव्हर पॉइंट क्रमांक २९२ हटविल्यानंतर तेथील मार्ग सपाट करून पुढील टप्प्यातील स्लिव्हिंग, कटिंग आणि कनेक्शनची कामे सुलभ होण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संबंधित ट्रॅक सर्किटमध्येही यशस्वीपणे बदल करण्यात आले.
या कामासाठी सुमारे २५० कामगारांसह पाच जेसीबी, दोन पोकलेन आणि दोन हायड्रा यंत्रे तैनात करण्यात आली होती. मोठ्या मनुष्यबळाच्या मदतीने नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात आले. ब्लॉकच्या कालावधीत रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विविध तांत्रिक कामे समन्वयाने पार पाडण्यात आली. त्यामुळे पुढील कामांसाठी आवश्यक पायाभूत तयारी पूर्ण झाली आहे.
हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गिकेच्या उभारणीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील टप्प्यांमध्ये अतिरिक्त ट्रॅक, सिग्नलिंग, अभियांत्रिकी आणि अन्य संबंधित कामे करण्यात येणार आहेत. सुरक्षितता, वाहतूक ब्लॉकचा प्रभावी वापर आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर रेल्वे विभागाचा भर आहे.
-अतिरिक्त रेल्वे मार्गिका उभारणी
-सिग्नलिंग व दूरसंचार यंत्रणेतील कामे
-अभियांत्रिकीशी संबंधित विविध कामे
-ट्रॅक व रुळांचे जोडणीचे काम
-सुरक्षितता उपाययोजनांसह टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचे नियोजन






