Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नीरामध्ये संताप; केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका

पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नीरा येथील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2026 | 01:49 PM
विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नीरामध्ये संताप; केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ नीरामध्ये संताप; केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका

Follow Us
Follow Us:

नीरा : देशातील विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नीरा येथील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

 

सभेत वक्त्यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी लाठीमाराचा मार्ग स्वीकारणे कोणत्याही लोकशाही सरकारला शोभणारे नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात असेल, तर ती चिंतेची बाब असल्याचे नीराचे उपसरपंच राजेश काकडे यांनी म्हटले नमूद केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी विद्यार्थी आणि आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी केली. “लोकशाहीचा हक्क आमचा अधिकार”, “विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा” आणि “लाठीमाराचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सभेनंतर विद्यार्थ्यांनी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्याकडे निवेदन सादर केले.

हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

या निषेध सभेला नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, सदस्य संदीप धायगुडे, अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, सुनील चव्हाण, अनंता शिंदे, ॲड. आदेश गिरमे, दादा गायकवाड, डॉ. श्रीणीक शहा, सचिन मोरे, मंगेश ढमाळ, राजेंद्र बरकडे, शांतिकुमार कोठडीया, सुरेश वीर, महेश जेधे, दयानंद चव्हाण, अकबर सय्यद, सिकंदर शेख, शशिकांत जगदाळे, भगवान गोफणे, अजित सोनवणे, आदिराज कोठडीया, स्वप्निल कांबळे, अमोल घुले, प्रसाद सोनवणे, विद्यार्थी पवन बिचकुले आणि सक्षम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सभेच्या शेवटी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Citizens of nira have expressed anger over the central governments stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • Neera News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार
1

Rahul Gandhi : राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मोदींवरील वक्तव्याच्या मानहानी खटल्याची कार्यवाही सुरूच राहणार

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
2

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
3

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO
4

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.