पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नीरा येथील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.
दुकानदार राजाराम उर्फ मांगीलाल चौधरी यांनी ही पर्स सापडल्यानंतर ती सुरक्षित ठेवली होती. कोणीतरी पर्स शोधत येईल या अपेक्षेने त्यांनी ती बाजूला ठेवत दुकानातील कर्मचाऱ्यांनाही याची माहिती दिली होती.
नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यामुळे नीरा खोऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी भविष्यात पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.
नीरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्यानंतर नीरा व पाडेगाव परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुसळधार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत २००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.