Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Weather: पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात…

सोमवारपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असून किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाऊ शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 15, 2026 | 02:35 AM
Pune Weather: पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात…
Follow Us
Follow Us:

पुणे शहरात उकाड्याचा कडाका
पुणे शहरात तापमानात किंचित घट संभव
ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता

पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि, ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले जात होते. शनिवारी (ता. १४) तापमानात आणखी वाढ झाली. लोहगाव परिसरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले. तर पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. किमान तापमानातही वाढ होऊन ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. दरम्यान, शनिवारी पुणे व परिसरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते.

Pune Heat Wave: हुश्श! किती तो उन्हाळा; पुणेकर उकाड्याने वैतागले; पारा थेट…

रविवारी (ता. १५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून ते सुमारे १९ अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारी किंवा संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सोमवारपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असून किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाऊ शकते. या कालावधीत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर व सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

पुणेकर उकाड्याने वैतागले

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. शहरात किमान १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

India Weather: लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार

दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने दुपारच्या सुमारास उकाड्यात अधिक भर पडली. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. सकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असली, तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले.

 

Web Title: Citizens of pune are distressed by the summer heat latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • heat wave
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
2

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
3

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
4

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.