
"पुण्याच्या विकासाचा नवा..."; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट
पुणे: पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. प्रत्येक राज्याला एकच कृती इंजिन आहे, परंतु महाराष्ट्राला नवी मुंबई आणि पुणे अशी दोन ग्रोथ इंजिन आहेत. पुण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून शहराला शाश्वत, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्याचे प्रगतीपर्व या तीन हजार कोटींच्या विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यासाठी तीस ते पस्तीस हजार कोटींचा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. कोणतेही काम नियोजन करून केले पाहिजे . त्याला नियोजन नसेल तर केलेली कामे देखील पाडावी लागतात. त्यामुळे नियोजन करूनच मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे. पुण्यात सर्वात मोठी वाहतुकीची समस्या आहे. बॉटल नेक मुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. यासाठी शहरात टनेल नेटवर्क डेव्हलप करणार आहे. रिंग रोड तयार करण्यात आले आहेत. दोनशे किलोमीटर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. ३२ मिसिंग लिंक रस्ते तयार करणे त्यामुळे ताशी स्पीड पाच ते दहा किलोमीटर वाढू शकते असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्याला शाश्वत शहर बनवण्यासाठी जायकाकडून २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एसटीपी शहरात मोठ्या प्रमाणावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे पाणी शुद्ध करून सिंचनाला वापरता येईल आणि धरणातील पाणी पिण्यासाठी वापरता येईल असे फडणवीस म्हणाले.
पुणे आणि मुंबई ही शहरे जगाला परिचित आहेत. आयटी, शिक्षण आणि उद्योग यांचे हे प्रमुख केंद्र आहे. आता केवळ कामासाठी नव्हे, तर उत्तम राहणीमानासाठी पुणे कसे आदर्श शहर बनेल, यावर भर दिला जात आहे. शहरातील सर्वात मोठा प्रश्न वाहतूक कोंडीचा असून, त्यावर महापालिका आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. रिंग रोड, मिसिंग लिंक, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, बॉटलनेक काढणे यामुळे वाहतूक सुलभ होईल. भविष्यात भुयारी मार्ग आणि बोगद्यांचा पर्यायही अभ्यासपूर्वक राबवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“ज्यांच्यामुळे भगवा जिवंत…”; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण