(फोटो- एक्स)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
आज दुपारनंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता
पुणे :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्यात आज विविध विकासकामांचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधन केले.
LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण 🕒 दु. २.५७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे. #Maharashtra #Pune #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/xY5lqATwx5 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मी सकाळी इचलकरंजीमध्ये गेलो. तिथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर सांगलीला गेलो अन् लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. आता कोंढवा येथे ज्यांनी तुम्हाला-आम्हाला स्वाभिमान शिकवला, ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत आहे, अशा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला मिळणे यालाही मागच्या जन्माची पुण्याई लागते. लोकांच्या भाजीच्या देठालाही बोट लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. कोणत्याही मोठ्या माणसाने एखाद्या स्त्रीचा अवमान केला, तिच्यावर अत्याचार केला, तरीदेखील कठोरात कठोर शिक्षा देणारे असे छत्रपतींचे शासन होते.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्या प्रकारे सातत्याने लढाई करून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य तयार झाल्यावर, ते छत्रपती झाल्यानंतर ते दुर्दैवाने फार काळ यांच्यामध्ये राहू शकले नाहीत. मात्र महाराष्ट्रात आणि भारतामध्ये असे तेज निर्माण केले होते की, त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलाना झुंजवत ठेवले. याच महाराष्ट्राच्या भूमीत मराठ्यांनी औरंगजेबाची कबर खोदली. मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवळा. आम्हाला स्वाभिमान देणारे, यांचा अभिमान असणारे आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही अस्तित्वात आहोत, त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आज या ठिकाणी तयार झाला आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते आज कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.






