मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
निवडणूक आयोगाने जाहीर केला महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक जाहीर होताच मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता
पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. २ हजार ७८९ जागांसाठी निवडणुका होणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू केली गेली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचव या महानगरपालिकांची निवडणूक महत्वाची समजली जात आहे. दरम्यान आज निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या निवडणुकांमध्ये यांच्या शासनाने केलेले काम पाहता पुन्हा कौल यांच्या बाजूने येईल. जनता आम्हाला शहर विकासाची संधी देईल. आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती होईल.”
महानगरपालिका चुनाव एवं युवा नेता नितिन नबीन जी इनकी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष के रूप में नियुक्ति को लेकर मीडिया से संवाद। (पुणे | 15-12-2025)#Maharashtra #Pune #Elections pic.twitter.com/FH3EKbRLjE — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2025
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी अशी युती होईल. पुण्यात मात्र माझी आणि अजित पवार यांची चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे. कदाचित पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप आमने-सामने लढताना दिसतील. ही लढत मैत्रीपूर्ण असणार आहे. कुठेही कटुता नसेल.”
छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्यात आज विविध विकासकामांचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधन केले.
“ज्यांच्यामुळे भगवा जिवंत…”; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मी सकाळी इचलकरंजीमध्ये गेलो. तिथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर सांगलीला गेलो अन् लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. आता कोंढवा येथे ज्यांनी तुम्हाला-आम्हाला स्वाभिमान शिकवला, ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत आहे, अशा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली.”






