Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ज्यांच्यामुळे भगवा जिवंत…”; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 15, 2025 | 03:47 PM
"ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत..."; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

"ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत..."; CM फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर 
पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण 
आज दुपारनंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता

पुणे :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्यात आज विविध विकासकामांचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधन केले.

LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण 🕒 दु. २.५७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे. #Maharashtra #Pune #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/xY5lqATwx5 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मी सकाळी इचलकरंजीमध्ये गेलो. तिथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर सांगलीला गेलो अन् लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.  आता कोंढवा येथे ज्यांनी तुम्हाला-आम्हाला स्वाभिमान शिकवला, ज्यांच्यामुळे आज भगवा जिवंत आहे, अशा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करायला मिळणे यालाही मागच्या जन्माची पुण्याई लागते. लोकांच्या भाजीच्या देठालाही बोट लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. कोणत्याही मोठ्या माणसाने एखाद्या स्त्रीचा अवमान केला, तिच्यावर अत्याचार केला, तरीदेखील कठोरात कठोर शिक्षा देणारे असे छत्रपतींचे शासन होते.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्या प्रकारे सातत्याने लढाई करून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य तयार झाल्यावर, ते छत्रपती झाल्यानंतर ते दुर्दैवाने फार काळ यांच्यामध्ये राहू शकले नाहीत. मात्र महाराष्ट्रात आणि भारतामध्ये असे तेज निर्माण केले होते की, त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुघलाना झुंजवत ठेवले. याच महाराष्ट्राच्या भूमीत मराठ्यांनी औरंगजेबाची कबर खोदली. मराठ्यांनी  अटकेपार झेंडा  रोवळा. आम्हाला स्वाभिमान देणारे, यांचा अभिमान असणारे आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही अस्तित्वात आहोत, त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आज या ठिकाणी तयार झाला आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते आज कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Cm devendra fadnavis unveiled statue of chhatrapati shivaji maharaj at katraj kondhwa pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • CM Devendra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.