
लोकहो! स्वेटर, शाल आपले रक्षणकर्ते; राज्यात थंडीचा कडाका वाढणार, IMD ने दिला 'हा' इशारा
महाराष्ट्र राज्यात थंडीची लाट येणार
सहा राज्यांमध्ये किमान तापमान दहाच्या खाली जाणार
पाऱ्याची सुई सात-आठ अंशांपर्यंत खाली घसरणार
राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल दिसून येत आहे. काही दिवस आधी राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र वातावरणीय बदलांमुळे थंडीचा (Winter) कडाका कमी झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. राज्यात हवामानाचा रंगच बदलायला लागला आहे भाऊ. एकीकडे दिवसभर ऊन तापतंय, लोक शेतात काम करताना गरम वारा जाणवतोय, पण पहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास हवेत गारवा जाणवत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता. पर्वतीय राज्यांमध्ये म्हणजेच जम्मू कशमिर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फाची चादर दिसून येत आहेर. उत्तरेकडून येणारे गार वारे आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहेत.
आयएमडीने तसा इशारा दिला आहे. पुढील आठवड्यात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. रियाणा, पंजाबपासून, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, बिहार अशा सहा राज्यांमध्ये किमान तापमान दहाच्या खाली जाणार आणि काही ठिकाणी पाऱ्याची सुई सात-आठ अंशांपर्यंत खाली घसरणार अशी परिस्थिती आहे.
पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडणार
पुणे आणि परिसरामध्ये किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र शुक्रवारपासून (ता. ५) पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणेकरांनो स्वेटर, शाली बाहेर काढा! पारा ११ अंशावर घसरला; पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडणार
राज्यातील थंडीचा कडाका तीव्र होत असून पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच पुढील 48 तासांत थंडीची ही लाट अधिक तीव्र होणार आहे . यामध्ये पुणे अहिल्यानगर, नाशिक ,जळगाव, नंदुरबार, धुळे येथील किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर काही भागात पारा सात ते आठ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार आहे.