Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो स्वेटर, शाली बाहेर काढा! पारा ११ अंशावर घसरला; पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडणार

पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारी (ता. ४) किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 03, 2025 | 09:40 PM
पुणेकरांनो स्वेटर, शाली बाहेर काढा! पारा ११ अंशावर घसरला; पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडणार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे शहरात हुडहुडी कायम 
तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम 
पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहणार

पुणे:
 पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या थंडीचा जोर कायम असून, किमान तापमानाचा (Weather) पारा सतत घसरत आहे. त्यामुळे पुणेकरांनी सोमवार, मंगळवार आणि बुधवार (ता.३) सलग तीन दिवस पहाटेच्या थंडीत हुडहुडी भरवणारा माहोल अनुभवला. तर पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील कोरडेपणा वाढल्याने आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक तीव्र झाल्याने हिवाळ्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे.

शहर आणि परिसरात बुधवारी किमान तापमान सुमारे ११.५ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून त्यानंतर मात्र किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. परिणामी थंडीचा कडाका आणखी काही दिवस कायम राहील अशी शक्यता आहे.

पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारी (ता. ४) किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र शुक्रवारपासून (ता. ५) पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात शीतलहर! पारा १३ अंशावर, ढगाळ वातावरणासह थंडीची लाट; हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात शीतलहर

राज्यातील थंडीचा कडाका तीव्र होत असून पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच पुढील 48 तासांत थंडीची ही लाट अधिक तीव्र होणार आहे . यामध्ये पुणे अहिल्यानगर, नाशिक ,जळगाव, नंदुरबार, धुळे येथील किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर काही भागात पारा सात ते आठ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार आहे. मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीची कडाक्याची लाट आली असून , नाशिक जिल्ह्यात मंगळवारी किमान तापमान 10.3 अंशांवर होतं तर महाबळेश्वरमध्ये हा आकडा 12 अंशांवर होता. ज्यामुळं नाशिक महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरत आहे.

Web Title: Pune temperature dropees 11 celsius winter season cold weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Weather
  • Winter Season

संबंधित बातम्या

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध
1

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?
2

Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप
3

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी
4

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.