Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित; ऊन अन् विजेच्या अतिवापरामुळे केबलमध्ये बिघाड

पुण्यात वाढत्या उष्णतेसोबतच विजेच्या मागणीत झालेल्या वाढीचा परिणाम आता वीज यंत्रणेवर दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे परिमंडळात सात ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 14, 2026 | 04:50 PM
कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित; ऊन अन् विजेच्या अतिवापरामुळे केबलमध्ये बिघाड

कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित; ऊन अन् विजेच्या अतिवापरामुळे केबलमध्ये बिघाड

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात वाढत्या उष्णतेसोबतच विजेच्या मागणीत झालेल्या वाढीचा परिणाम आता वीज यंत्रणेवर दिसू लागला आहे. अतिउष्णता आणि ओव्हरलोडमुळे केबल्स गरम होऊन वितळत असल्याने गेल्या दोन दिवसांत पुणे परिमंडळात सात ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक भागांतील नागरिकांना तासन्तास वीजखंडित परिस्थितीचा सामना करावा लागला. कोंढवा परिसरात केबल फॉल्ट शोधण्यात आणि दुरुस्तीस विलंब झाल्याने नागरिकांना तब्बल १६ तास अंधारात राहावे लागले. तर कोथरूड, बाणेर, पिंपरी, भोसरी आणि कोंढवा या भागांतही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या.

 

उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यांत विजेची मागणी नेहमीच वाढते. सध्या पुणे परिमंडळातील वीज मागणी चार ते साडेचार हजार मेगावॅटवर पोहोचली असून, मासिक वीजवापर १७०० दशलक्ष युनिटच्या पुढे गेला आहे. वाढत्या लोडमुळे अॅल्युमिनियम आणि कॉपरच्या केबल्समध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे केबलवरील रबर आणि प्लास्टिकचे संरक्षणात्मक आवरण तापून कमकुवत होते व केबल बर्स्ट किंवा जॉईंट तुटण्याच्या घटना घडतात, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कोथरूडमधील मयूर कॉलनी आणि कर्वे पुतळा परिसरात सोमवारी दुपारी आणि रात्री अशा दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. भोसरीमध्ये वीजवाहिन्यांमध्ये पक्षी अडकल्याने बिघाड झाला, तर पिंपरी आणि बाणेर येथे उष्णतेमुळे केबल्स वितळल्याने फॉल्ट निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महावितरणकडून नागरिकांना विजेसंदर्भातील तक्रारींसाठी १९१२, १८००२३३३४३५ आणि १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपवरूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट

सिंहगड रस्ता परिसरात सहा तास वीज खंडित

राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, पुण्यात तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले आहे. अशा परिस्थितीत नागरिक उकाड्याने हैराण झालेले असतानाच महावितरणने दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. १४) सिंहगड रस्ता परिसरातील अनेक भागांमध्ये तब्बल सहा तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत हा वीजपुरवठा खंडित राहिला. महावितरणच्या माहितीनुसार नांदेड सिटी टाऊनशिप, वारजे टॉवर वर्क्स, राठी बेहरे परिसर, भुजबळ टाऊनशिप, इंद्रायणी कॉलनी, हॅपी कॉलनी, आनंदनगर, आरएमडी कॉलेज व स्कूल परिसर, श्रीराम सोसायटी, वसुधा इश्वरा तसेच उत्तमनगर, दांगट पाटील नगर, शिंदे पार्क, कोंढवे धावडे, रामनगर, गणपती माथा, शिवणे आणि खडकवासला परिसरातील वीजपुरवठा बंद राहिला.

Web Title: Complaints of power outages are being received in many areas of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • mahavitaran
  • pune news
  • Summer

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.