Pune News : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डिजिटल प्रक्रियेमुळे सेवा जलद झाली असली, तरी एआयच्या मदतीने खोटी कागदपत्रे तयार करून सादर करण्याचे आव्हानही वाढले आहे. काही अर्जदार खरी माहिती लपवून खोटी कागदपत्रे देत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकरणांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पासपोर्टच्या तत्काळ सेवेलाही पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०२१ मध्ये केवळ ७,२१३ नागरिकांनी तत्काळ कोट्यातून अर्ज केले होते. मात्र २०२५ मध्ये ही संख्या तब्बल ८५,८९७ वर पोहोचली. अवघ्या पाच वर्षांत तत्काळ पासपोर्ट घेणाऱ्यांची संख्या दहापटीहून अधिक वाढल्याचे दिसून येते.
२०२१ ते २०२५ या कालावधीत पासपोर्ट कार्यालयाकडे एकूण २० लाख ४२ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १९ लाख ५९ हजार ६४४ नागरिकांना पासपोर्ट वितरित करण्यात आले असून, वितरणाचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
पासपोर्ट अर्जांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ पुणेकरांचा परदेशातील शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाकडे वाढता कल अधोरेखित करत आहे.
पुण्याचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी सांगितले की, “पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे डिजिटल झाले असून, अपॉइंटमेंटपासून पासपोर्ट मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि अधिक वेगवान झाली आहे. अर्जदारांनी शासनाने निर्धारित केलेली कागदपत्रे पूर्ण करून अर्ज केल्यास प्रक्रिया सुलभ होते. आमचा उद्देश ३० दिवसांत पासपोर्ट वितरित करण्याचा आहे. मात्र, कागदपत्रांतील त्रुटी आणि पोलिस पडताळणीतील विलंबामुळे काही अर्जांना उशीर होतो.”
| वर्ष | अर्ज | वितरित पासपोर्ट |
|---|---|---|
| २०२१ | २,३९,९८६ | २,३२,७६७ |
| २०२२ | ३,६४,०९५ | ३,४७,१३७ |
| २०२३ | ४,७४,४१३ | ४,७१,४५४ |
| २०२४ | ४,५५,१६० | ४,३५,३२० |
| २०२५ | ५,०८,५२८ | ४,७२,९६६ |
Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी






